घरमहाराष्ट्रकोरोना पॉझिटिव्ह असल्याची अफवा पसरवून डॉक्टरच्या मुलाला मारहाण

कोरोना पॉझिटिव्ह असल्याची अफवा पसरवून डॉक्टरच्या मुलाला मारहाण

Subscribe

गो कोरोना गो म्हणत केली मारहाण

एका महिला डॉक्टरचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह असल्याची अफवा पसरवत त्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाषाण रस्ता परिसरातील मंत्री अव्हेन्यू पंचवटी सोसायटीत हा प्रकार घडला असून या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सोसायटीत राहणाऱ्या डॉ. स्नेहा सम्राट घोरपडे (४७) यांचा मुलगा सोहम याला रॉडने मारहाण करण्यात आली आहे. तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या संशयावरून त्याला ही मारहाण करण्यात आली असून अनिल शिवबच्चन गिरी (४५), अमितकुमार गिरी (४०), सतीश रेगे (६०) आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे गुन्हा दाखल झालेले हे सर्वजण याच सोसायटीत राहतात. सोहमला केलेल्या मारहाणीमुळे आई स्नेहा यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक राकेश सरडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ स्नेहा या रेडिओलॉजिस्ट म्हणून औंध आणि वाकडमध्ये प्रशिक्षण करतात. तसंच त्या आपल्या पती सम्राट व मुलगा सोहम यांच्यासह मंत्री अव्हेन्यू पंचवटी सोसायटीत राहतात. १६ जूनला सोसायटीतील रहिवाशी असणाऱ्या सतीश रेगे यांनी सर्वांना मॅसेज पाठवून कोरोना रुग्णांनासंदर्भात माहिती देण्यास सांगितलं होतं. यावेळी सम्राट यांचं सतीश रेगे यांच्याशी फोनवर बोलणं झालं असतं तुमचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह असून त्याच्यावर घरीच उपचार करत असल्याचं सांगण्यात आलं. मात्र आपला मुलगा कोरोना पॉझिटिव्ह नाही असं सम्राट यांनी सांगून देखील सोसायटीत अफवा पसरवण्यात आली. सोसायटीतील एका पॉझिटिव्ह रुग्णाकडून सोमहने पुस्तकं आणली होती. म्हणूनच इतरांकडून सोहमवर त्याला कोरोनाची लागण झाल्याचा संशय घेण्यात आला होता. त्यामुळे सोहमची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्याला १५ दिवस घरातच क्वारंटाईन करण्यात आलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी सोहमला काहींनी खाली बोलावलं सोहम आणि संबंधितांमध्ये काही कारणामुळे वाद झाला. यात सोहमला त्यांनी मारहाण केली असता त्याला आठ टाके देखील पडले. इतकंच नव्हे तर अनिल आणि अमितकुमार यांनी “जो डरते है, वो चोर हैं, गो कोरोना गो”, असं म्हणत दरवाज्या बाहेर थुंकले. तर अमित आणि अनिल यांनी सोहमला कोरोना पॉझिटिव्ह म्हणून त्याच्यावर बहिष्कार घाला असं म्हणत त्याला मारहाण करा असं सांगितलं. या सर्व प्रकारावरून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच त्यांना नोटीस पाठवून त्यांना चौकशीसाठी देखील बोलवलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अद्याप निकालाची तारीख जाहीर नाही; अफवांवर विश्वास ठेवू नका – CBSE


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -