घरCORONA UPDATEदेशाच्या लोकसंख्येच्या २६ टक्के लोक करोनाबाधित होऊ शकतात, ४५० करोनाग्रस्तांमागे १ मृत्यू...

देशाच्या लोकसंख्येच्या २६ टक्के लोक करोनाबाधित होऊ शकतात, ४५० करोनाग्रस्तांमागे १ मृत्यू अटळ

Subscribe

देशात कोव्हिड १९ साठीच्या झालेल्या पहिल्या वहिल्या अभ्यासानुसार करोनाचा व्हायरसमुळे कम्युनिटी ट्रान्समिशनचे प्रकार थांबवले जाऊ शकतात. पण हे थांबवल्यामुळे काही काळासाठी कम्युनिटी ट्रान्समिशन फक्त लांबवणीवर पडेल, असा अभ्यास इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने जाहीर केला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रवाशांचे स्क्रिनिंग आणि सोशल डिस्टसिंग यासारख्या प्रतिबंधात्मक उपाय योजना घेतल्याने कम्युनिटीमधील ट्रान्समिशन काही काळासाठी रोखले जाऊ शकतात. पण हे पुर्णपणे थांबवता येणार नाही. आयसीएमआरने एका जर्नलच्या माध्यमातून हा अभ्यास प्रकाशित केला आहे. त्यामध्ये आयसीएमआरचे प्रमुख एपिडेमॉलॉजिस्ट आर गंगाखेडकर यांच्या अभ्यासाचाही समावेश आहे.

सोशल डिस्टन्सिंगमध्ये घरगुती क्वारंटाईन यासारख्या पद्धतींमुळे एकुणच करोनाची लागण होण्याचे ६२ टक्के प्रमाण कमी केले जाऊ शकते. तर करोना पॉझिटीव्हची संख्या ८९ टक्क्यांपर्यंत वाढण्यापासूनही बचाव केला जाऊ शकतो. म्हणूनच करोनाचा वाढता आलेख स्थिरावण्यासाठी मदत होऊ शकेल. हा संपुर्ण अभ्यास करताना १ करोनाग्रस्ताची लागण ही १.५ लोकांना होऊ शकते या आधारावर करण्यात आली आहे. आय़सीएमआरच्या अभ्यासानुसार करोनामुळे एका मृत्यू पाठोपाठ १० गंभीर करोनाग्रस्तांची प्रकरणे असतील. तर ४० ते ५० प्रकरणे ही किरकोळ अशा स्वरूपाची असतील. भारताच्या लोकसंख्येनुसार देशात २६ टक्के लोकांना करोनाची लागण होऊ शकते. तर करोनाची लागण झालेल्यांपैकी १ जणांचा मृत्यू होऊ शकतो असा अभ्यास आयसीएमआरने केला आहे.

- Advertisement -

सोशल डिस्टन्सिंगमुळे सध्याचा करोना पॉझिटीव्हचा आलेख हा स्थिरावण्यास मदत होईल. तसेच आणखी वाढत्या प्रकरणांमध्येही स्थिरता येईल. जेव्हा परदेशी प्रवासाची कोणत्याच पद्धतीचा इतिहास नसेल आणि एकाचवेळी मोठ्या प्रमाणात मोठ्या जनसमुदायाला करोनाची लागण होईल अशावेळी आपण स्टेज ३ मध्ये म्हणजे कम्युनिटी ट्रान्समिशनमध्ये पोहचलेले असू. सध्या भारतात करोनाची लागण ही ज्यांनी परदेशी प्रवास केला आहे किंवा अशा व्यक्तींच्या संपर्कात जे लोक आले आहेत अशांनाच झालेली आहे.

सोशल डिस्टन्सिंगमुळे सध्याचा करोनाचा आलेख हा स्थिर होईल, असा निष्कर्ष या अभ्यासातून काढण्यात आला आहे. आयसीएमआरने मॅथेमॅटिकल मॉडेलिंगचा वापर यासाठी केला आहे. प्रवास करणाऱ्यांचे सातत्याने स्क्रिनिंग झाले तर करोनाचा प्रसार थांबवता येऊ शकतो असे अभ्यासातून समोर आले आहे. सोशल डिस्टन्सिंगमुळे या व्हायरसचा प्रसार समाजामध्ये दिरंगाईने होण्यासाठी मदत होईल. सरासरी एक ते तीन आठवड्याच्या कालावधीने ही दिरंगाई करणे शक्य असल्याचे आयसीएमआरचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -