घरताज्या घडामोडीCoronavirus: 'करोना'च्या संशयितांची घरीच होणार तपासणी

Coronavirus: ‘करोना’च्या संशयितांची घरीच होणार तपासणी

Subscribe

मुंबई महानगरपालिकेद्वारे आता कोविडची चाचणी घरीच करता येणार असून मुंबई महानगरपालिका संशयित रुग्णांची कोविड-१९ ची चाचणी करण्यासाठी नवीन दूरध्वनी क्रमांक सुरु करणार आहे.

मुंबई महानगरपालिकेद्वारे आता कोविडची चाचणी घरीच करता येणार आहे. मुंबई महानगरपालिका संशयित रुग्णांची कोविड-१९ ची चाचणी करण्यासाठी नवीन दूरध्वनी क्रमांक सुरु करणार आहे. ही सुविधा पुढील दोन दिवसांत सुरु होईल. सध्या ज्या प्रवाशांना घरी अलगीकरण सल्ला देण्यात आला आहे आणि ज्यांना त्रास आहे त्यांना आयसीएमआर संस्थेने मान्यता दिलेल्या प्रयोगशाळेमध्ये कोविड चाचणी उपलब्ध आहे.

कोविड-१९ चाचणीसाठी लवकरच हेल्पलाईन

- Advertisement -

हेल्पलाईन क्रंमाक कार्यान्वित झाल्यानंतर, हेल्पलाईन वरील डॉक्टर संशयित रुग्णाची पूर्ण माहिती घेतील आणि गरज असल्यास कोविड चाचणी करण्याचा सल्ला देतील. चाचणी नमुना घरी येऊन घेणे आणि तपासणीसाठी आयसीएमआर संस्थेने मान्यता दिलेल्या प्रयोगशाळेत पाठवणे यासाठी समन्वय करून देतील.

एका दिवशी १६ करोना रुग्णांचे निदान

- Advertisement -

मुंबईतही करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सोमवारी शहर उपनगरात १६ करोना रुग्णांचे निदान झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी अधिक सर्तकता बाळगून घरातच राहण्याचे आवाहन यंत्रणांकडून होत आहे.

सोमवारी कस्तुरबा, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, राजावाडी, कुर्ला भाभा, वांद्रे भाभा आणि खासगी रुग्णालयांच्या एकत्रित अहवालानुसार, मुंबईत १६ करोना रुग्णांचे निदान झाले. तर रविवारी ४१८ आंतरराष्ट्रीय प्रवास केलेल्यांचे अलगीकरण करण्यात आले. तर महापालिकेच्या संशयित रुग्णांची कोविड-१९ चाचणी करण्यासाठी नवीन दूरध्वनी क्रमांक सुरु होत आहे. ही सुविधा पुढील दोन दिवसांपासून सुरु होईल. सध्या ज्या प्रवाशांना घरी अलगीकरण सल्ला देण्यात आला आहे, आणि ज्यांना त्रास आहे त्यांना आयसीएमआरने मान्यता दिलेल्या प्रयोगशाळेमध्ये चाचणी उपलब्ध आहे. हेल्पलाईन क्रमांक कार्यानिवीत झाल्यानंतर हेल्पलाईनवर डॉक्टर संशयित रुग्णांची पूर्ण माहिती घेतील. तसेच गरज भासल्यास कोविड चाचणी करण्याचा सल्ला देतील. चाचणी नमुना घरी घेऊन येणे आणि तपासणीसाठी इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने मान्यता दिलेल्या प्रयोगशाळेत पाठविणे यासाठी समन्वय करुन देतील.

बाह्यरुग्ण विभागात दाखल झालेले रुग्ण २७४
एकूण भरती झालेले संशयित रुग्ण ७२
मुंबईतील पॅझिटिव्ह रुग्ण १६
डिस्चार्ज झालेले रुग्ण १०१
रुग्णालयात भरती असलेले रुग्ण १३०


हेही वाचा – जेजेत ही ‘विलगीकरण कक्ष’; दिवसाला १५० चाचण्या करणे शक्य!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -