Thursday, February 18, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी शेतकरी आंदोलकांचा मुंबईत पहिला मुक्काम

शेतकरी आंदोलकांचा मुंबईत पहिला मुक्काम

Related Story

- Advertisement -

कृषीविषयक कायद्याच्यानिषेधार्थ नाशिकहून हजारो शेतकरी बांधव मुंबईतील आझाद मैदानात धडकले आहेत. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात या आंदोलनातून कृषी कायद्याविरोधात दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा दिला जाणार आहे. नाशिकच्या गोल्फ क्‍लब मैदानातून निघालेला हा मोर्चा रविवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कसारा, भिवंडी मार्गे मुंबईतील आझाद मैदानात धडकला. हजारो शेतकरी ट्रक,टेम्पो, चारचाकी, दुचाकीने मोर्चात सहभागी झाले आहेत. मुंबईत दाखल झालेल्या शेतकऱ्यांनी तारपा या पारंपारिक नृत्याचे सादरीकरण करत शेतकऱ्यांनी एकता दाखवली. त्यानंतरची रात्रही हजारो शेतकऱ्यांनी मैदानात तयार करण्यात आलेल्या मंडपातच झोपून काढली. शेकडो किलोमीटरचे अंतर पायी कापूनही शेतकरी बांधवांचा उत्साह कुठे कमी झाला नव्हता. या ठिकाणी आदिवासी विभागातून आलेल्या शेतकऱ्यांनी रात्री एकत्रित पारंपरिक वाद्यांच्या तालावर ठेका धरला. (फोटो साभार- दिपक साळवी)

- Advertisement -