घरमहाराष्ट्रपूरग्रस्तांसाठी जाणार मुंबईतून गणेशमूर्ती

पूरग्रस्तांसाठी जाणार मुंबईतून गणेशमूर्ती

Subscribe

महापूरामुळे कोल्हापूर, सांगली, या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या पुरामुळे या दोन्ही शहरात ऐन सणासुदीच्या काळात होत्याचे नव्हते झाले. पुरात अनेक गणेशमूर्ती शाळांमध्ये घडवण्यात आलेेल्या गणपतीच्या मूर्ती वाहून गेल्या. ऐन गणेशोत्सवाच्या काळात गणेशमूर्ती आणण्याच्या कुठून असा प्रश्न पूरग्रस्तांना पडला असताना मुंबईतील परळ येथील सचिन शेट्टे यांची बाप्पाची मूर्तीशाळा पूरग्रस्तांसाठी धावून आली आहे. कोल्हापूरच्या ग्रामीण भागात ज्यांच्या घरी बाप्पा विराजमान होतो त्यांच्या घरी आता मुंबईतून बाप्पाची मूर्ती पाठवण्यात येणार आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि मूर्तीशाळा प्रमुख सचिन शेट्टी यांनी कोल्हापूरच्या ग्रामीण भागात मूर्ती मोफत पाठवण्याचा निर्णय घेतला आह

पूरामुळे कोल्हापूरमधील ७० हून अधिक गणेशमूर्ती बनवणार्‍या कारखान्यांचे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी आणि पूरग्रस्त भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून १०० हून अधिक गणेशमूर्ती भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूरात पाठवणार असल्याचे सचिन शेट्टे यांनी सांगितले. तसचे या मूर्तीसोबत पूजेचे साहित्यही पाठवण्यात येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सचिन शेट्टी यांनी मागील चार दिवसांपासून आपल्या मूर्ती शाळेतून गणेशमूर्तींची विक्री थांबवली आहे.

- Advertisement -

गणेशोत्सवाला काही दिवस शिल्लक असताना ते आता १०० हून अधिक गणेशमूर्ती कोल्हापूरला पाठवणार आहेत. दरवर्षी त्यांच्या मूर्ती शाळेमध्ये ५०० गणेशमूर्ती विक्रीसाठी ठेवल्या जातात. त्यातील काही मूर्ती या कोकण, कोल्हापूरमध्येही पाठवल्या जातात. मात्र यंदा कोल्हापूरमध्ये पाठवणार्‍या मूर्तींचे पैसे घेणार नाही, असे शेट्टी यांनी सांगितले.

पूराचा फटका कोल्हापूरातील गणेशमूर्ती कारखान्यांना बसला आहे. त्यामुळे आम्ही आमच्या शाळेतील गणेशमूर्ती कोल्हापूर एक पैसाही न घेता पाठवणार आहोत.
– सचिन शेट्टे, कार्यशाळा प्रमुख, परळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -