घरमहाराष्ट्रदिवाळीनिमित्त शिक्षकांना २५ हजारांचा अग्रीम द्या

दिवाळीनिमित्त शिक्षकांना २५ हजारांचा अग्रीम द्या

Subscribe

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना २५ हजार अग्रीम रक्कम देण्यात यावी, अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात येत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक महिन्यांपासून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना वेतन मिळत नसल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. पुढील महिन्यात असलेल्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना २५ हजार अग्रीम रक्कम देण्यात यावी, अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात येत आहे.

दिवाळीनिमित्त राज्य शासकीय कर्मचार्‍यांना अग्रीम रक्कम देण्यात येते. कोरोनाच्या काळात आर्थिक संकटाचा सामना सर्वानाच करावा लागत आहे. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची कुटुंबेही आर्थिक अडचणीतून सुटलेली नाहीत. अनेक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची वैद्यकीय बिले, वेतनाची थकीत बिले, सातव्या वेतनाची थकबाकी आणि वरिष्ठ व निवडश्रेणीच्या थकबाकी सरकारकडून अद्याप मिळालेली नाहीत. शिवाय अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवाळी साजरा करता यावा तसेच त्यांना आर्थिक दिलासा मिळवा, यासाठी २५ हजार अग्रीम रक्कम देण्यात यावी, अशी मागणी शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांकडून होत आहे. अनेक वर्षांपासून १२ हजार ५०० रुपये एवढी अग्रीम रक्कम मिळत आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांची झालेली आर्थिक कोंडी यामुळे यंदा पूर्वीप्रमाणे १२ हजार ५०० रुपये इतकी अग्रीम रक्कम न देता २५ हजारांपर्यंत अग्रीम रक्कम वाढवावी, अशी विनंतीही शिक्षकांकडून करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -