घरमहाराष्ट्रMaharashtra Gram Panchayat: विजयसिंह मोहिते पाटलांनी वर्चस्व राखलं पण...

Maharashtra Gram Panchayat: विजयसिंह मोहिते पाटलांनी वर्चस्व राखलं पण…

Subscribe

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या गटाने पुन्हा एकदा अकलूज ग्रामपंचायतीवरील आपली सत्ता कायम राखली आहे. मोहिते पाटील गटाने १७ पैकी १४ जागांवर विजय संपादन करत अकलूज ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता राखली आहे. मात्र, एकीकडे विजय मिळाला असला तरी पुतण्याच्या पराभवामुळे मोहिते पाटील यांना धक्का बसला आहे. विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे आणि ज्येष्ठ नेते जयसिंह उर्फ बाळादादा यांचे चिरंजीव संग्रामसिंह मोहिते-पाटील यांचा पराभव झाला आहे.

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी सुरु असून आज निकाल लागणार आहेत. अनेक ग्रामपंचायतींच्या निकालावर साऱ्यांच्या नजरा लागून होत्या. अकलूज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोठी चुरस होती. कारण विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात डॉ. धवलसिंह पाटील यांनी आव्हान उभं केलं होतं. मात्र, अकलूजमधील लोकांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर विश्वास ठेवत त्यांच्या बाजूने कौल दिला आहे.

- Advertisement -

अकलूज ग्रामपंचायतीच्या १७ जागांपैकी एका जागेवर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या पत्नी उर्वशीराजे मोहिते या बिनविरोधी निवडून आल्या. त्यामुळे उर्विरित १६ जागांसाठी निवडणूक झाली. या १६ जागांसाठी सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील आणि विजयसिंह मोहिते-पाटील विकास पॅनेलचे १६, प्रतापसिंह मोहिते पाटील विकास पॅनेलचे १६ आणि अपक्ष १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.


हेही वाचा – राज्यात महाविकास आघाडीची चलती – अजित पवार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -