घरट्रेंडिंगमुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर टोल दरवाढ

मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर टोल दरवाढ

Subscribe

एमएसआरडीसीने आयरबी इन्फ्रास्ट्रक्चरसोबत करार करत आगामी १० वर्षे २ महिन्यांसाठी टोल वसुलीचे कंत्राट दिले आहे. अशी आहे वाढीव टोलची रक्कम...

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबई पुणे एक्सप्रेस वे साठी नव्या कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. आगामी १० वर्षे २ महिन्यांच्या कालावधीसाठी या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. एमएसआरडीसीच्या काही बड्या प्रकल्पांसाठी ही टोल कंत्राटदारांकडून मिळणारी रक्कम वापरण्यात येणार आहे. एमएसआरडीसीला मिळणाऱ्या महसूलातून मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर पायाभूत सुविधा विकासाची कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी ७ हजार कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. या कामात मिसिंग लिंकची निर्मिती तसेच टनेलिंगचे काम पुर्ण करण्यात येणार आहे.

१ एप्रिलपासून अशी असेल दरवाढ

- Advertisement -

राज्य सरकारच्या नोटीफिकेशननुसार येत्या १ एप्रिलपासून या मार्गावर वाहनचालकांसाठी टोलच्या दरांमध्ये वाढ होणार आहे. कारसाठी आता २३० रूपयांएवजी २७० रूपये मोजावे लागतील. तर मिनी बससाठी ३३५ रूपयांएवजी आता ४२० रूपये मोजावे लागणार आहेत. तर ट्रक आणि हेवी एक्सेलच्या वाहनांसाठी ४९३ रूपयांवरून ५८० रूपये अशी वाढ करण्यात आली आहे. मोठ्या बसेससाठी ६७५ रूपयांएवजी आता ७९७ रूपये आकारण्यात येतील. तर मोठ्या ट्रकसाठी ११६५ रूपयांएवजी आता १३८० रूपय ते १८३५ रूपये अशी नवीन टोलमधील वाढ आहे. येत्या १ एप्रिलपासून ही दरवाढ लागू होणार आहे. पुन्हा एकदा आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चरला टोल कलेक्शनचे कंत्राट एमएसआरडीसीकडून देण्यात आले आहे.

आयआरबीला पुन्हा ११ वर्षांचे टोल वसुलीचे कंत्राट 

आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चरकडून एमएसआरडीसीला ८२६२ कोटी रूपये इतकी रक्कम देण्यात येणार आहे. तसेच येत्या १० वर्षे २ महिन्यांसाठी या कंपनीकडे टोल वसुलीचे हक्क राहणार आहेत. आयआरबीसह अदाणी ग्रुपनेही या निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला होता. पण नंतर अदाणी ग्रुप या निविदा प्रक्रियेतून बाहेर पडला. सध्याचे टोल वसुलीचा करार हा ऑगस्ट २०१९ मध्येच संपला होता. आधीचे टोल वसुलीचे कंत्राट हे म्हैसकर इन्फ्रास्ट्रक्चर आणि आयआरबी डेव्हलपर्स यांना मिळाले होते. या कंत्राटदार कंपनीसोबत एमएसआरडीसीने १५ वर्षांचा करार केला होता. त्यावेळी कंत्राटदार कंपनीने एक रकमी असे ९१८ कोटी रूपये मोजले होते. टोल वसुलीचा १५ वर्षांचा करार संपल्यानंतर तात्पुरत्या कालावधीसाठी सहकार ग्लोबल या कंपनीला तात्पुरते कंत्राट देण्यात आले होते. नवीन करारासाठी आयआरबी ही एमएसआरडीसीला एक रकमी ६५०० कोटी रूपये देणार आहे. तर उर्वरीत रक्कम ही टप्प्याटप्प्याने देण्यात येईल.

- Advertisement -

 

१ एप्रिलपासूनचे असे आहेत नवीन दर (रूपयांमध्ये)

वाहन      जुना दर        नवा दर

कार          २३०             २७०

मिनी बस   ३३५            ४२०

ट्रक          ४९३            ५८०

मोठी बस   ६७५          ७९७

मोठा ट्रक   ११६५          १३८० ते १८३५


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -