घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक जिल्हयातील आठ हजार शेतकर्‍यांना मिळाला पीएम किसानचा लाभ

नाशिक जिल्हयातील आठ हजार शेतकर्‍यांना मिळाला पीएम किसानचा लाभ

Subscribe

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनसाठी आतापर्यंत जिल्हयातील ३ लाख ३४ हजार ८३१ शेतकरी कुटूंब पात्र ठरले असून यापैकी २ लाख ४६ हजार ७३ शेतकर्‍यांची माहिती केंद्राच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसाठी आतापर्यंत जिल्हयातील ३ लाख ३४ हजार ८३१ शेतकरी कुटूंब पात्र ठरले असून यापैकी २ लाख ४६ हजार ७३ शेतकर्‍यांची माहीती केंद्राच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. या योजनेचा शुभारंभ आज गोरखपुर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. नाशिक येथेही आयोजीत कार्यक्रमात पहिल्या टप्प्यात प्रातिनिधीक स्वरूपात जिल्हयातील ८ हजार शेतकर्‍यांच्या खात्यात पीएम किसानचा पहिला हप्ता वर्ग करण्यात आला. या शेतकर्‍यांचा विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्र येथे आयोजित या योजनेच्या शुभारंभाप्रसंगी आमदार देवयानी फरांदे, आमदार नरेंद्र दराडे, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, कृषीसहसंचालक रमेश भताणे, जिल्हा कृषी अधीक्षक संजीव पडवळ उपस्थित होते. २०१९-२०च्या हंगामी अर्थसंकल्पात पीएम-किसान या योजनेची घोषणा करण्यात आली होती. याअंतर्गत दोन हेक्टर किंवा त्याहून कमी लागवडयोग्य जमीन असलेल्या देशभरातील १२ कोटी शेतकर्‍यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा निधी दिला जाणार आहे. ही रक्कम तीन टप्प्यांमध्ये दिली जाणार आहे. कृषी क्षेत्रातील आर्थिक संकटावर मात करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाआहे. विभागात शेतकर्‍यांना पहिल्या टप्प्यात या योजनेचा लाभ देण्यासाठी ६७ कोटी रूपये या योजनेंतर्गत वितरीत करण्यात आले. विभागात ८ लाख ३९ हजार ४ शेतकर्‍यांना मिळणार असल्याची माहिती जिल्हाप्रशासनाने दिली. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात १० शेतकर्‍यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शेतकर्‍यांची माहीती संकलित करण्यासाठी तलाठी संवर्गातील कर्मचार्‍यांनी विशेष परिश्रम घेतल्याचे नमुद करून त्यांच्यासह या योजनेसाठी परिश्रम घेणारया सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांचे विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी अभिनंदन केले.

- Advertisement -

तालुकानिहाय लाभार्थी असे…

निफाड – २९,३५०
सिन्नर – ४६,०९७
येवला – २२,१०८
कळवण – १७,६६८
नाशिक – २२,१७७
दिंडोरी – ३०,५६१
पेठ – ७,३७६
इगतपुरी – ११,९६३
त्र्यंबकेश्वर – १२,७८५
देवळा – ११,०५२
नांदगाव – २८,५७०
चांदवड – २४,२९५
बागलाण – २२,२६६
सुरगाणा – १४,४६४
मालेगाव – ३४,०९९
……………………………………….
एकुण ३,३४,८३१

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -