घरमहाराष्ट्रनाशिकजिल्हयातील ४० हजार मयत, दुबार मतदारांची नावे वगळली

जिल्हयातील ४० हजार मयत, दुबार मतदारांची नावे वगळली

Subscribe

मतदार यादी शुध्दिकरण मोहीम

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर निवडणुक शाखेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या मतदार यादी पडताळणी मोहीमेंतर्गत आतापर्यंत ४० हजार दुबार, मयत मतदारांची नावे वगळण्यात आली आहे.

लोकसभा निवडणूकीत मतदार यादीत गोंधळ झाल्याच्या अनेकांच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे निवडणुका आटोपताच विधानसभा निवडणुकीत मतदार यादी निर्दोष असावी यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलत बीएलओंना घरोघरी जाउन मतदार यादी पडताळणीचे आदेश दिले. त्यानूसार जिल्हयात व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानूसार मतदार याद्यांच्या पडताळणीत सुमारे ३३ हजार नावे ही मयत आणि दुबार आढळून आली असून आणखी काही नावे अतिरिक्त निघण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

मतदारांकडून मतदार यादीतील नावांसंदर्भात अपेक्षित आणि वेळोवेळी काळजी घेतली जात नसल्याने दुबार आणि मयत मतदारांची नावे यादीत कायम राहतात. यंदा ही संख्या मोठी असल्याचे या मोहीमेतून समोर आले आहे. निवडणुक शाखेने नुकतीच बीएलओंची बैठक घेउन प्रत्येक बीएलओंना २५० घरांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानूसार बीएलओंनी व्हॉटसअप ग्रुप तयार केले असून याव्दारे मतदारांपर्यंत पोहचणे सहज शक्य होणार आहे.तर नावे वगळण्यात आल्यानंतर २८ हजार नवमतदारांची नोंद करण्यात आली आहे.

जिल्हयात ४५ लाख मतदार

जिल्हयात एकूण ४५ लाख ५ हजार ३२० मतदारांची नोंद करण्यात आली आहे. यात २३ लाख ५८ हजार ६६० पुरूष मतदार तर २१ लाख ४६ हजार ५६८ महीला मतदार असून ९२ तृतीयपंथी मतदारांची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -