घरमहाराष्ट्रनाशिकस्वस्त किराणा पडला २ लाखांत

स्वस्त किराणा पडला २ लाखांत

Subscribe

पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

स्वस्त दरात किराणा मालाची होम डिलीव्हरी देण्याच्या आमिष चौथे दाम्पत्याने माधुरी एखंडे (४०, रा.मखमलाबाद) यांच्यासह अनेक महिलांना दाखविले. एखंडेंच्या ब्युटी पार्लरमध्ये येत चौथे दाम्पत्याने नातवाच्या ऑपरेशनसाठी २ लाखांची गरज असल्याचे सांगितले. त्यावर विश्वास ठेवत एखंडेंनी २ लाख रूपये दिले.

किराणा माल विक्रीसाठी चौथे दाम्पत्याने अनेक महिलांकडून रोख रक्कम घेतली. मात्र, त्यांना पैसे परत दिले नाहीत. याप्रकरणी एखंडे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. संशयित सोनम अनिल चौथे, अनिल रामचंद्र चौथे, प्रेम अनिल चौथे (रा. तळेनगर, रामवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

- Advertisement -

पोलिसांच्या माहितीनुसार, १ जानेवारी २०१८ ते १३ जुलै २०१९ या दरम्यान संशयित सोनम चौथे, अनिल चौथे, प्रेम चौथे यांनी एखंडे यांच्यासह अनेक महिलांची भेट घेतली. महिलांना स्वस्त दरात किराणा उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखविले. अन्नपूर्णा महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही संस्था स्वत:ची असल्याचे चौथे दाम्पत्याने सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर एखंडे यांच्या ब्युटी पार्लरमध्ये येत नातवाच्या ऑपरेशनसाठी २ लाख रूपये मागितले. त्यांच्यावर विश्वास ठेवत एखंडे यांनी २ लाख रूपये दिले. तसेच अनेक महिलांकडून किरणा माल विक्री रोख रक्कम घेतली. पैशांची परत देण्याची मागणी करूनही कोणाचेही पैसे दिले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -