घरताज्या घडामोडीअशी आहे पॉझिटिव्ह रुग्णांची हिस्ट्री

अशी आहे पॉझिटिव्ह रुग्णांची हिस्ट्री

Subscribe

नाशिक जिल्हा प्रशासनास मंगळवारी (दि.२) 16 नवे रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये नाशिक शहर ८, नांदगाव २, इगतपुरी ३, मालेगाव, कणकोरी, सोनेवाडी (ता.सिन्नर) येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. मंगळवारी दिवसभरात दोन बाधितांचा मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यात आजवर एकूण १ हजार २७६ रुग्ण करोनाबाधित सापडले असून, ७५ बाधितांचा मृत्यू झाला आहे. नाशिक शहरात २३७ रुग्ण बाधित असून, ८५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर, एकूण ११ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मालेगावात नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी झाले असले तरीही नाशिक शहरात वडाळागाव, पेठरोड, मार्केटयार्ड करोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. मंगळवारी शहरात नवीन ८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. वडाळारोड येथील १ (मृत), कामटवाडा, त्रिमूर्ती चौक १, गंगापूर रोड १, शिवसमर्थ नगर १, सादिकनगर, वडाळागाव १, रोहिणीनगर, पेठरोड १, नाशिक शहरातील २ रुग्णांचा समावेश आहे.

शहरातील बाधित रुग्णाचा मृत्यू
अमृतधाममधील बिडी कामगारनगर येथील ५७ वर्षीय पुरुषामध्ये करोनासदृश्य लक्षणे दिसून आल्याने त्यास ३० मे रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे स्वाब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना ३१ मे रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना मधुमेह व रक्तदाबाचा विकार होता. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचा मंगळवारी (दि.२) मृत्यू झाला.

- Advertisement -

बाधित वयोवृद्धाच्या नातलगाचे मार्केटयार्ड कनेक्शन
किशोर सूर्यवंशी मार्ग, समर्थनगर येथील ६६ वर्षीय वृद्धाचा अहवाल कोरोना बाधित असल्याचा प्राप्त झाला आहे. त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती मार्केटयार्डात कामाला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सिडकोतील ३७ वर्षीय पुरुष बाधित
शिवशक्ती चौक,सिडको येथील ३७ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

गंगापूर रोडवरील रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
गंगापूर रोडवरील शर्मिला अपार्टमेंट येथील ४९ वर्षीय महिला कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यांच्यावर बिटको हॉस्पिटल येथील कोरोना कक्ष येथे उपचार सुरू आहेत.

शहर पोलीस दलात करोनाचा शिरकाव
मालेगावी बंदोबस्तासाठी गेलेल्या पोलिसांनाच करोनाची लागण झाली होती. आता,
नाशिक शहर पोलीस दलात करोनाने शिरकाव केला असून सोमवारी (दि.१) भद्रकाली पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचारी बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. अशोका मार्ग परिसरातील रहिवासी आहे. चार दिवसांपुर्वी ते संगमनेर येथे गेले होते. खबरदारी म्हणून शहर पोलीस दलातील प्रत्येकाची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. करोनासदृश्य लक्षणे आढळून आलेल्यांना डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शहरातील सात ठिकाणी निर्बंध
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधित रुग्ण आढळून आलेल्या परिसर व इमारतीमधून नागरिकांनी ये-जा बंद करावी. कामवाली बाई, भाजीवाला, फळवाला, धोबी, किराणावाला आदींना इमारतीत येवू नये, यासाठी महापालिकेने मनाई आदेश जारी केले आहेत. शहरात मंगळवारी नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून रुग्ण राहत असलेला परिसर खबरदारी म्हणून महापालिकेने सील केला आहे. बालाजी प्रग्यान-सरस्वती मंदिराजवळ-विनयनगर, शिवशक्तीनगर-त्रिमुर्ती चौक, पंडीत पार्क-कृषीनगर, शर्मिला बिल्डींग, बी विंग, जुना गंगापूरनाका, कालेकर चाळ-म्हसरुळ, रवी अपार्टमेंट-ओमकारनगर-पंचवटी, गजानन चौक-गुरुव्दारा रोड, पंचवटी हे परिसर व इमारत महापालिकेने सील केल्या आहेत.

शहरातील एक इमारत निर्बंधमुक्त
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर रुग्ण राहत असलेली पंचवटीतील गुरुव्दारा रोडवरील गंगा अपार्टमेंट सील केली होती. मात्र, बाधित रुग्ण या इमारतीमध्ये राहत नसल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे महापालिकेने इमारत निर्बंधमुक्त केली आहे.

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -