घरमहाराष्ट्रनाशिकव्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवून युवकाने केली आत्महत्या

व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवून युवकाने केली आत्महत्या

Subscribe

तेजाब चित्रपटातील ‘सो गया ये जहा, सो गया आसमा’ या गाण्यावर व्हिडीओ बनवून व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवत २४ वर्षीय युवकाची आत्महत्या

तेजाब चित्रपटातील ‘सो गया ये जहा, सो गया आसमा’ या गाण्यावर व्हिडीओ बनवून व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवत २४ वर्षीय युवकाने मध्यरात्री घराच्या आड्याला साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि.१) सकाळी उघडकीस आली. स्टेट्सबाबत मित्रांनी त्याला विचारणा केली असता त्याने काहीच सांगितले नाही. नाशिक शहारातील पंचवटी-म्हसरूळ गावातील राजवाड्यात राहणार्‍या चोवीस वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. या आत्महत्या करणाऱ्या युवकाने त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी घडल्याचे उघडकीस आल्यानंतर याबाबत म्हसरूळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा घडला प्रकार

म्हसरूळ येथील राजवाड्यात २४ वर्षीय सनी गौतम पगारे हा आई-वडिलांबरोबर राहत होता. या तरूणाचे वडील एकलहरे येथील औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प येथे काम करतात. पुढील दोन महिन्यानंतर मुलगा सनी हा त्यांच्या जागी नोकरीस लागणार होता. सनीचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले होते. गुरुवारी (दि.३१) रात्री सनीने हिंदी चित्रपट तेजाब यातील ‘सो गया ये जहा सो गया आसमा’ या गाण्यावर व्हिडिओ बनवून व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस् ठेवले. त्याचे हे स्टेटस् बघताच सनीच्या मित्रांनी सनी यास फोन करून विचारणा करण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणाही मित्राच्या फोनला त्याने उत्तर दिले नाही.

- Advertisement -

रात्री उशिरापर्यंत एका मित्रासोबत जवळपास एक ते दीड वाजेपर्यंत तो होता. त्यानंतर घरी येऊन घराच्या माडीवर तो झोपायला गेला. मात्र, शुक्रवारी (दि.१) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास त्याची आई त्यास उठवण्यास गेली असता सनीने साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेले दिसून आले.

दरम्यान पोलिसांनी सनीने मध्यरात्रीच्या सुमारास आत्महत्या केली असल्याची शक्यता वर्तवली आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद देखील करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -