घरताज्या घडामोडीजिल्ह्यात कुपोषित बालकांचा शोध सुरु

जिल्ह्यात कुपोषित बालकांचा शोध सुरु

Subscribe

एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत नवजात बालकांचे वजन घेण्यास सुरुवात

नाशिक:कोरोनाशी सामना करताना इतर आजारांकडे होणारे दुर्लक्ष घातक असल्याने आता महिला व बालकल्याण विभागाने जिल्ह्यातील कुपोषित बालकांचा शोध घेणे सुरु केले आहे. एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत अतितीव्र कुपोषित बालकांचे वजन करण्यात येणार असून, आवश्यकता वाटल्यास त्यांना योग्य आहारही पुरवण्यात येणार आहे.

राज्यातील अंगणवाडी केंद्र सुरु करण्यास आयसीडीएस आयुक्तांनी नुकतीच परवानगी दिली. त्यामुळे अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात आले असून बालकांचे वजन घेण्यास सुरूवात झाली आहे. कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्यात लॉकडाऊन होता. याकाळात अंगणवाडी केंद्र सुरू बंद होती. मात्र, याकाळातही अंगणवाडी बालकांना अंढी, पोषण आहाराचे वाटप नियमित सुरू होते. अंगणवाडी केंद्र बंद असल्याने बालकांचे नियमित वजन घेणे बंद झाले होते. त्यामुळे कुपोषीत बालकांची संख्या लक्षात येत नव्हती. परंतू, लॉकडाऊन शिथील केल्यानंतर शासनाने काही अटी-शर्तीवर अंगणवाडी केंद्र सुरू करून केवळ बालकांचे वजन घेण्यास परवानगी दिली आहे. या परवानगीनंतर जिल्ह्यात अंगणवाडी केंद्र सुरू करून बालकांचे वजन घेण्यास मदतनीस, कर्मचारी यांनी सुरूवात केली आहे.
….
झोळीचा कापड स्वत: आणा
अंगणवाडी केंद्र सुरू करून बालकांचे वजन घेतांना शासनाने अटी घातल्या आहेत. यात प्रामुख्याने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी मास्क वापरणे व सॅनिटेरायझरचा वापर करणे, कामकाज करतांना सोशल डिस्टन्सींग ठेवणे, अंगणवाडी केंद्रात एका दिवसात पाच मुलांना गरोदर व स्तनदा माता यांना वजन उंची घेण्यासाठी बोलविण्याचे आदेश दिले आहेत.वजनकाटे वापरासंदर्भात झोळीसाठी आवश्यक असलेला कपडा लाभार्थ्याच्या पालकांनी घरुनच आणण्याचे आदेशही दिले आहेत.
….
जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण जास्त असल्याने त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने अंगणवाडीमध्ये लहान बालकांचे वजन केले जात असून, त्याना पूरक आहारही दिला जात आहे. सर्दी, खोकला व ताप अशा प्रकारची लक्षणे असलेल्या माता, बालकांना अंगणवाडी केंद्रात बोलवू नये, असे आदेश दिले आहेत.
-अश्विनी आहेर, सभापती (महिला व बालकल्याण समिती)

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -