Thursday, February 18, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक म्हसरुळ परिसरात वळूचा थरार

म्हसरुळ परिसरात वळूचा थरार

पोलिस कॉन्स्टेबल मनोज काकड यांनी वळूविषयी माहिती पुरुषोत्तम यांना कळविताच त्यांच्यासह दहा तरुणांचा समूह या वळूला लाठ्या-काठ्या घेऊन पकडायला निघाला.

Related Story

- Advertisement -

भर रस्त्यात सैरभर पळणारा, दिसेल त्याला शिंग मारुन जखमी करणारा आणि पायाच्या जखमेने जीवाच्या अकांतात विव्हळणारा जखमी वळू काही दिवसांपासून म्हसरुळकरांचा चर्चेचा विषय ठरत होता. या वळूविषयी भीतीची भावना निर्माण झाल्याने लोक रस्ता बदलत असत . एका पोलिस कॉन्स्टेबलने याविषयीची माहिती प्राणीमित्र पुरुषोत्तम आव्हाड यांना कळविली आणि काही क्षणातच या वळूला पकडण्याची कसरत सुरु झाली. तब्बल सहा तास चाललेल्या या कसरती अंती वळू जेरबंद झाला आणि त्याच्या पायाचे वाढलेले खूर कापून त्याला मुक्त करण्यात आले.

वाचा- २५ डिसेंबर: आंबेडकरांनी रायगडमध्येच का जाळली मनुस्मृती?

वळू होता वेदनेने असहाय्य

म्हसरुळ परिसरात वावरणार्‍या या वळूच्या पायाचे खूर वाढले होते. त्यामुळे त्याला मोठी जखम झाली होती. आणि त्याचा पाय जखमेमुळे कुजला होता. या जखमेच्या वेदना इतक्या होत्या की तो वळू तीन पायांवर चालत होता. पायाच्या जखमेमुळे आक्रमक झालेला हा वळू कोणावरही हल्ला करीत होता. पोलिस कॉन्स्टेबल मनोज काकड यांनी वळूविषयी माहिती पुरुषोत्तम यांना कळविताच त्यांच्यासह दहा तरुणांचा समूह या वळूला लाठ्या-काठ्या घेऊन पकडायला निघाला. मात्र वळू अधिक आक्रमक होत सैरभैर पळू लागला. यात दोन दुचाकीस्वार थोडक्यात बचावले. काही वेळात तो परिसरातील स्वामी समर्थ मंदिराच्या आवारात पोहचला. यावेळी मंदिरात धार्मिक कार्यक्रम सुरु होता.गर्दीही मोठ्या प्रमाणात होती. वळूचे आक्रमक रुप बघून गर्दी मंदिराच्या आवाराबाहेर पडली. तेथे बराचवेळ वळूला पकडण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. अखेर लाठीधारी तरुणांनी विळखा देत त्याच्या गळ्याला दोरी अडकवली यांनी त्याला पकडले. आणि त्याच्या पायावरील जखमेवर प्रथमोपचार केले.

‘किटकॅट’च्या पाकिटांमध्ये सापडला १९ किलो गांजा
- Advertisement -