घरमहाराष्ट्रनाशिकअयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Subscribe

या निकालांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दल सतर्क

अयोध्या खटल्याचा निकाल आता अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपला आहे. या ऐतिहासिक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धार्मिक, सामाजिक दृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या या खटल्याच्या निकालानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ग्रामीण पोलीस दलाने जय्यत तयारी केली आहे. निकालानंतर कोणाच्या भावना दुखावल्या जावू नयेत, यासाठी जिल्ह्यात २ हजार ६६१ पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे.

देशासह जगभर खटल्याच्या निकालाबाबत उत्सुकता

नोव्हेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयात देशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे चार खटल्यांचा निकाल जाहीर होणार आहेत. अयोध्येतील वादग्रस्त जमिनीच्या मालकीचा खटला हा या चार खटल्यांतील सर्वाधिक चर्चेतील खटला आहे. देशाच्या सामाजिक, राजकीय आणि धार्मिक पातळ्यांवर बदल घडवण्याची ताकद या प्रकरणात असल्याने देशासह जगभर या खटल्याच्या निकालाबाबत उत्सुकता आहे. न्या. गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय खंडपीठ या खटल्याचा निकाल देणार आहे. हा निकाल एकमताने होतो की त्याबाबत खंडपीठीत दुमत होते, याकडेही सगळ्यांचे लक्ष आहे.

प्रतिबंधक कारवाई आदेश

निकाल लागल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर अफवा पसरुन सार्वजनिक शांततेला बाधा पोहचून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार्‍यांवर प्रतिबंधक कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. जिल्ह्यात फिक्स पाँईट तयार करण्यात आले असून पायी गस्त व पेट्रोलिंग अशा पद्धतीने बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. – डॉ. आरती सिंह पोलीस अधीक्षक, नाशिक

- Advertisement -

या चार खटल्यांचा निकाल होणार जाहीर

अयोध्या जमीन प्रकरण, शबरीमाला मंदिर महिला प्रवेश, राफेलप्रकरणी सरकारला क्लीन चीट, सरन्यायाधीश माहिती अधिकाराच्या कक्षेत या चार खटल्यांचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दल सतर्क झाले आहे. धार्मिक सलोखा आणि कायदा तसेच सुव्यवस्था राखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

असा असणार बंदोबस्त

पोलीस अधीक्षक         ०१
अपर पोलीस अधीक्षक   ०२
पोलीस उपअधीक्षक     ०८
पोलीस निरीक्षक         ३०
पोलीस उपनिरीक्षक     ८०
पोलीस कर्मचारी      २५००
होमगार्ड                 ४००


मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार; संजय राऊत यांचा पुनरुच्चार
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -