आर.आर. पाटीलांचे बंधू राजाराम पाटील यांना दुसऱ्यांदा ‘राष्ट्रपती पदक’

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दोन सहायक पोलीस आयुक्त तर एका पोलीस निरीक्षक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यांना उत्कृष्ठ सेवेसाठी पोलीस पदक जाहीर करण्यात आले.

Maharashtra
r.r. patils brother acp rajaram patil announces presidential medal for second time
सहायक पोलीस आयुक्त राजाराम रामराव पाटील

राज्याचे माजी गृहमंत्री दिवंगत आर.आर. पाटील यांचे बंधू सहायक पोलीस आयुक्त राजाराम रामराव पाटील यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले असून त्यांना दुसऱ्यांदा सन्मानित करण्यात येणार आहे. यासह सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव आणि पोलिस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांना देखील राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. सविस्तर माहिती अशी की, स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक मिळणार असल्याचे जाहीर झाले आहे. त्यात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दोन सहायक पोलीस आयुक्त तर एका पोलीस निरीक्षक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. उत्कृष्ठ सेवेसाठी पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सहायक पोलीस आयुक्त राजाराम रामराव पाटील हे देखील पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यरत आहेत. तर रामचंद्र जाधव यांची एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख आहे. ते देखील पिंपरी-चिंचवड शहरात कार्यरत आहेत.

त्यांच्या बरोबर बालाजी सोनटक्के हे अगोदर चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहत होते. ते आता गुन्हे शाखेचे काम पाहतात. महाराष्ट्रातील पाच जणांना राष्ट्रपती पोलीस पदक मिळाले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची मान अभिमानाने उंचावली गेली आहे.