घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात धाडस नाही - राधाकृष्ण विखे पाटील

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात धाडस नाही – राधाकृष्ण विखे पाटील

Subscribe

मुख्यमंत्र्यांमध्ये धाडस नसल्यामुळे अतिरिक्त पोलिस महासंचालक परमवीर सिंग आणि पोलीस आयुक्त यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात धाडस नाही म्हणूनच अतिरिक्त पोलिस महासंचालक परमवीर सिंग आणि पोलीस आयुक्त यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. भाजप सरकार सनातन संघटनांना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे संबंधित पोलिसांना बडतर्फ केले जावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

एटीएस यंत्रणावर वरिष्ठ पोलीसच दबाव आणत होते

अतिरिक्त पोलीस महासंचालक यांनी विचारवंतांच्या कारवाई संदर्भात पत्रकार परिषद घेतली होती. महासंचालकांनी राजकीय भूमिका घेऊनच ही पत्रकार परिषद घेतली की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. चौकशी करणारी एटीएस यंत्रणावरच वरिष्ठ पोलीसच दबाव आणत होते का? हा दबाव कोणाचा आहे हे सांगण्याची गरज नाही. वास्तविक मुख्यमंत्र्यांनी एटीएसचे कौतुकच केले नाही तर पुरोगामी विचारवंत यांच्या अटके संदर्भात पत्रकार परिषद घेण्यास अतिरिक्त पोलीस महासंचालकांना भाग पाडलं असा आरोप विखे पाटील यांनी केला आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री नेमक्या कोणत्या भूमिकेत?

सनातन आणि हिंदुत्ववादी संघटनांची लागेबंधामुळे विचारवांच्या मारेकऱ्यांचा कर्नाटक एटीएसने पदार्फाश केला. यामुळेच मी कर्नाटकच्या गृह मंत्र्यांची भेट घेऊन कर्नाटक एटीएसच अभिनंदन केल आणि याच वेळेला राज्याच्या एटीएसच देखील कौतुक केल. परंतु, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अद्यापही एटीएसच कौतुक केलेलं नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमक्या कोणत्या भूमिकेत आहेत हे लक्षात येत असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

पेट्रोल डिझेल दरवाढीवर टीका 

सातत्याने पेट्रोल- डिझेलची दरवाढ होत आहे. हे वाढलेले दर तुम्ही निवडणुकांच्या आधी कमी करणार आहात का असा खोचक प्रश्न विखे पाटील यांनी केला आहे. सरकारने जर कर कमी केले नाही तर निवडणुकीत सामान्य नागरिक सरकारला माफ करणार नाहीत असे देखील ते म्हणाले.

- Advertisement -

राम कदम यांना अटक करा

राम कदम यांचे विधान दुर्दैवी आहे. राम कदम यांना अटक करून तात्काळ करावाई केली जावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी जनसंघर्ष यत्रा जनतेच्या प्रश्नांसाठी वित्त मंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेवर टीका केली होती. या टीकेला विखे पाटील यांनी उत्तर देताना जनसंघर्ष यात्रेबद्दल तुम्ही चिंता करू नये, विठु माऊली या सरकारच्या पाठीमागे नाही हेच एकादशीला दिसून आले आहे. जनसंघर्ष यात्रा पंढरपूर येथील काँग्रेस सभेला गर्दी नव्हती, त्यामुळे सभा रद्द करावी लागली असे खोट बोलत असल्याच विखे पाटील यांनी म्हटंल आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -