घरमहाराष्ट्ररोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना सांगितले 'हे' कॅलक्युलेशन!

रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना सांगितले ‘हे’ कॅलक्युलेशन!

Subscribe

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. रोहित पवार यांनी जीएसटीच्या थकबाकीवरुन राज्याच्या भाजप नेत्यांवर निशाणा साधला होता. त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी, रोहित पवारांना कॅलक्युलेशन समजत नाही, त्यांनी अभ्यास करुन बोलावं, असा टोला लगावला होता. त्यांच्या या टीकेला रोहित पवारांनी फेसबुकवर सविस्तर पोस्ट टाकून कॅलक्युलेशनसह उत्तर दिले आहे.

काय आहे रोहित पवार यांच्या पोस्टमध्ये

रोहित पवारांना कॅलक्यूलेशन समजत नाही, त्यांनी अभ्यास करुन बोलावं, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्याची बातमी मी पाहिली. नेहमी ‘अभ्यास’ करणाऱ्या नेत्याने ‘अभ्यास’ न करताच माझ्यावर टीका का केली? याचं आश्चर्य वाटलं. पण ठीक आहे, बिहारच्या निवडणुकीत व्यस्त असल्यामुळं ‘अभ्यास’ करायला त्यांना वेळ मिळाला नसेल म्हणून त्यांनी टीका केली असावी. माझा त्यांच्याएवढा ‘अभ्यास’ नाही, पण मी वस्तुस्थिती मांडली. माझ्या कॅलक्युलेशनचं स्पष्टीकरण पुन्हा एकदा देतो. मी नाराजीतून किंवा माझ्याविरोधात कुणी बोललं म्हणून नाही तर वस्तुस्थिती समोर यावी, शाब्दिक खेळ आणि राजकीय टीकाटिप्पणी होऊ नये म्हणून ही टिपणी देतोय.

- Advertisement -

#GST च्या पैशाबाबत मी मांडलेल्या मतावर 'रोहित पवारांना कॅलक्यूलेशन समजत नाही, त्यांनी अभ्यास करून बोलावं' अशी टीका…

Posted by Rohit Rajendra Pawar on Saturday, August 29, 2020

पुढे रोहित पवार म्हणाले की, मला या विषयाचं राजकारण करायचं नाही किंवा करायची इच्छाही नाही. पण आज राज्याची तिजोरी रिकामी आहे. केंद्र सरकारकडून भरपाई देताना अनेक महिने उशीर होतोय. राज्यसमोर मोठं आर्थिक संकट आहे. अशा काळात दुसऱ्याच्या चुका शोधत न बसता आपण केलेली चूक सुधारण्याची मोठी संधी आहे. त्यामुळे वेळेत जीएसटी भरपाई देण्याची आणि स्थानिक संस्था करापोटी माफ केलेली रक्कम आधारभूत महसूलात परिगणित करण्याची मागणी त्यांनी केंद्राकडे लावून धरावी. ती मान्य करुन घ्यावी. सोबत त्यांनी जीएसटीबाबते कॅलक्युलेशनही मांडले आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

Unlock 4 : केंद्र सरकारची नवीन नियमावली; २१ सप्टेंबरपासून ‘या’ गोष्टींना सशर्त परवानगी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -