घरमहाराष्ट्रनाशिक'धीर सोडू नका'; शरद पवारांचे शेतकऱ्यांना भावनिक आवाहन

‘धीर सोडू नका’; शरद पवारांचे शेतकऱ्यांना भावनिक आवाहन

Subscribe

'शेतकर्‍यांना मदत मिळवून देण्याकरीता आपण सर्व प्रयत्न करू. परंतु आपण धीर सोडू नका, कोणत्याही परिस्थितीत मैदान सोडायचे नाही, जीवन उध्वस्त करायचे नाही', असे भावनिक आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

जिल्ह्यात मोठया प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. एकतर कर्ज काढून पीक घेतले आणि आता उभे असलेले पीक पूर्ण वाया गेले. त्यामुळे नैराश्येतून शेतकरी आत्महत्यांसारखा मार्ग पत्कारतात. आजच नाशिक दौर्‍यावर असतांना शेतकरी आत्महत्येची बातमी कानावर आली. परंतु, आपण काळजी करू नका. शेतकर्‍यांना मदत मिळवून देण्याकरीता आपण सर्व प्रयत्न करू. परंतु आपण धीर सोडू नका, कोणत्याही परिस्थितीत मैदान सोडायचे नाही, जीवन उध्वस्त करायचे नाही असे भावनिक आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

हेही वाचा – शिवसेनेला मोठा धक्का; ५ नोव्हेंबरला भाजप मंत्र्यांचा शपथविधी सोहळा!

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले शरद पवार?

कळवण, बागलाण तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर सटाणा येथे शरद पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले, ‘काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने कोल्हापूर, सांगलीत झालेल्या जलप्रलयाने तेथील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. आता पुन्हा अवकाळीने राज्यात हाहा:कार माजवला आहे. आज नाशिक जिल्ह्याचा दौरा केला असता द्राक्ष, कांदा, सोयाबीन, बाजरी, मका पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे चित्र दिसून आले. शेतकर्‍यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. मात्र आपण शेतकर्‍यांच्या पाठीशी आहोत. खरं म्हणजे सरकारने यावर तातडीने पावलं उचलणं आवश्यक आहे.’ परंतु, राज्यात सध्या सरकारच अस्तित्वात नाही. सरकार कधी येतेय याबाबत काही सांगू शकत नाही’, असा टोलाही त्यांनी लगावला. मात्र शेतकर्‍यांच्या मदतीसाठी मी केंद्राकडे धाव घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – आमच्यासमोर शिवसेनेचा कोणताही प्रस्ताव नाही – शरद पवार

- Advertisement -

‘परिस्थितीत धीर सोडून चुकिचा मार्ग पत्करू नका’

‘सरकारने शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली, ज्या शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला त्यांना आता राष्ट्रीयकृत बँकां दरवाजात उभे करत नाही, अशी कैफियत शेतकर्‍यांनी मांडली. या जिल्ह्याची जिल्हा बँकच डबघाईला आलेली आहे. याचाच अर्थ खाजगी सावकारांकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतले असू शकते. मात्र कर्जमाफीच्या शासकिय निकषात खाजगी सावकराकडून घेतलेले कर्ज माफीबाबत कोणतेही धोरण नसल्याने यातून काय मार्ग काढता येईल याबाबतही आपण सरकारशी चर्चा करू’, असे ते म्हणाले. नाशिक जिल्ह्यासह राज्यात शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरसकट पंचनामे करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ‘शेतकर्‍यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी आपण सरकार दरबारी पाठपुरावा करणार असून कोणत्याही परिस्थितीत धीर सोडून चुकिचा मार्ग पत्करू नका’, असे भावनिक आवाहनही पवार यांनी यावेळी शेतकऱ्यांना केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -