घरमहाराष्ट्रतेव्हा सरकार तरले... आता कसे पडेल? 'सामना' तून फडणवीसांना सवाल

तेव्हा सरकार तरले… आता कसे पडेल? ‘सामना’ तून फडणवीसांना सवाल

Subscribe

महाराष्ट्राचे सरकार अंतर्विरोधाने पडेल, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. यावर प्रत्युत्तर देताना पाच वर्षे खिशात राजीनामे असताना सरकार तरले, मग आताच कसे पडेल? असा सवाल केला आहे.

राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. नुकतंच विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार हे अंतर्गत वादातून सरकार पडेल असं विधान केलं होतं. यावर शिवसेनेने सामनामधून प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सेनेच्या मंत्र्यांचे राजीनामे खिशात असतानाही सरकार तरले, मग आताच कसे पडेल? असा सवाल शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्रातून करण्यात आला आहे.

सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. ते स्वत:च्या अंतर्गत वादातून पडेल, असं विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. याचा अर्थ असा की, सरकार पाडण्याचे आणि आमदार फोडण्याचे सर्व प्रयोग कोसळले आहेत. त्यामुळे तीन पक्षांत आपसात काही फाटेल व सरकार कमजोर होऊन पडेल याकडेच विरोधी पक्षाच्या आशा लागल्या आहेत, टोला संजय राऊतांनी सामनाच्या रोखठोकमधून भाजपला लगावला.

- Advertisement -

हेही वाचा – गेल्या २४ तासांत देशात ८ हजार ३८० नव्या रुग्णांची नोंद


महाराष्ट्राचे सरकार अंतर्विरोधाने पडेल, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. अंतर्विरोध म्हणजे काय? महाराष्ट्रात पाच वर्षे फडणवीस हे मुख्यमंत्री होते. शिवसेनेच्या पाठिंब्यावर त्यांचं सरकार चाललं. सरकारमध्ये राहून भाजप-सेना यांच्यात ‘अंतर्विरोध’ नावाचे झगडे रोजच सुरू होते. शिवसेनेचे मंत्री खिशात राजीनामे घेऊनच फिरत होते. तरीही ते सरकार अंतर्विरोधाच्या ओझ्याने पडले नाही. महाराष्ट्रात असा अंतर्विरोध कुणाला दिसत असला तरी सरकार पाच वर्षांचा काळ पूर्ण करेल, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -