घरमहाराष्ट्रपुणेकरांवर पाणीसंकट : उद्या दिवसभर शहराचा पाणीपुरवठा बंद

पुणेकरांवर पाणीसंकट : उद्या दिवसभर शहराचा पाणीपुरवठा बंद

Subscribe

पुणे शहराचा पाणी पुरवठा उद्या, गुरुवारी दिवसभरासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच शुक्रवारीदेखील कमी दाबाच्या पट्ट्याने पाण्याचा प्रवाह होणार असल्याचे सांगितले जात आहे.

पुणे शहराचा पाणी पुरवठा उद्या, गुरुवारी दिवसभरासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला आजच पाणी पुरवठा करून ठेवावा लागणार आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व जलकेंद्रांच्या दुरुस्तीचे काम गुरुवारी करण्यात येणार आहे. केल्या काही दिवसांपासून जलकेंद्र, जलवाहिन्या यांच्या दुरुस्ती आणि देखभालीचे काम प्रलंबीत होते. अखेर आता ते हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या बंद ठेवण्यात येणार आहेत.

जलकेंद्रांच्या दुरुस्तीचे काम 

दरम्यान, संपूर्ण एक दिवस पाणी बंद राहिल्यानंतर पाईपलाईनमध्ये व्हॅक्यूम निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे शुक्रवारीदेखील कमी दाबाच्या पट्ट्याने पाण्याचा प्रवाह होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुणेकरांना आजच तब्बल दोन दिवसांच्या पाण्याची सोय करून ठेवावी लागणार आहे. शिवाय पाणी जपून वापरण्याचे आवाहनही यावेळी पुणेकरांना करण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांआधी नवी मुंबईतदेखील पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता. भोकरपाडा इथून होणाऱ्या पाण्याचं जलशुद्धीकरण करण्यासाठी पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता.

- Advertisement -

हेही वाचा –

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे होणार टूरीझम हॉटस्पॉट

पुणे : मुंढवा – केशवनगर येथे धुमाकुळ घालणारा बिबट्या जेरबंद

- Advertisement -

अशी ठरणार खऱ्या पुणेकराची ओळख!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -