घरमुंबईम्हणून अमित राज ठाकरेंचे भाषण कार्यकर्त्यांसोबत उभं राहून ऐकतो

म्हणून अमित राज ठाकरेंचे भाषण कार्यकर्त्यांसोबत उभं राहून ऐकतो

Subscribe

आपल्या वडिलांचे हे भाषण अमित ठाकरे कार्यकर्त्यांमध्ये उभे राहून अमित ठाकरे भाषण ऐकणं पसंत करतात. आज १३ व्या वर्धापन दिवशीही अमित ठाकरे हे भाषणा दरम्यान उभे होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा म्हटल्या की तुफान गर्दी.. मग ते भाषण राज्याच्या कुठल्याही जिल्ह्यात असो… मुंबईत तर राज ठाकरे यांची एखादी सभा असली तरी मोठ्या प्रमाणात मनसेचे कार्यकर्ते गर्दी करतात. मग तासनतास उभं राहून का होईना मनसैनिक राज ठाकरेंचे भाषण ऐकतात. पण तुम्हाला माहित आहे जशी राज ठाकरे यांच्या भाषणाची क्रेझ त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे, तशीच क्रेझ त्यांचे चिरंजीव अमित राज ठाकरे यांना देखील आहे. पण आपल्या वडिलांचे हे भाषण अमित ठाकरे कार्यकर्त्यांमध्ये उभे राहून ऐकणं पसंत करतात. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आज मनसेच्या १३ व्या वर्धापनदिनी अमित ठाकरे यांनी राज ठाकरे यांचे भाषण उभं राहून ऐकणं पसंत केले.

म्हणून अमित ठाकरे राहिले उभे

आज १३ व्या वर्धापनदिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकं काय बोलणार? हे ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनसेचे कार्यकर्ते आले होते. यामुळे रंगशारदा सभागृहात कार्यकर्त्यांची इतकी गर्दी होती की तळ मजल्यावर मोठा स्क्रिन लावून देखील अनेक कार्यकर्ते रस्त्यावरच उभे होते. सभागृह तर अक्षरशः पूर्णतः भरून गेले होते. मात्र अमित ठाकरे जेव्हा सभागृहात आले तेव्हा त्यांना बसण्यासाठी जागा नव्हती. पुढच्या रांगेत बसलेल्या अभिजित पानसे यांनी अमित यांना बसण्यास सांगितले. पण हॉलमध्ये अनेक कार्यकर्ते उभे असल्याने अमित ठाकरे यांनी देखील उभं राहूनच राज ठाकरेंचे भाषण ऐकलं.

- Advertisement -

amit thackeray listening raj thackeray speech between the party workers

पण अमित ठाकरे आजच नाही तर नेहमीच राज ठाकरे यांचे भाषण उभं राहून ऐकताना दिसले आहेत. कृष्णकुंजवर पत्रकार परिषद असो किंवा मुंबईत कुठेही सभा असो. अमित ठाकरे थेट कार्यकर्त्यांमध्ये जाऊन बसतात किंवा उभे राहतात. पक्षामध्ये कार्यकर्त्यांचे स्थान मोठे, अशी अमित ठाकरेंची भूमिका अनेकदा पाहायला मिळाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -