घरमुंबईपाळीव कुत्र्यांनी रस्त्यावर केलेली 'शी' पडली महागात!

पाळीव कुत्र्यांनी रस्त्यावर केलेली ‘शी’ पडली महागात!

Subscribe

पाळीव कुत्र्याला बाहेर फिरायला नेणं काही मालकांना चांगलेच महागात पडले आहे. कारण, त्यांनी रस्त्यावर केलेल्या ‘शी’मुळे मालकांना दंड भरावा लागत आहे. त्यानुसार पालिकेने ४ डिसेंबर ते आतापर्यंत अनेक कुत्र्यांच्या मालकांकडून ६२ हजार रुपये एवढा दंड वसूल केला आहे. रस्त्याच्या बाजूला अनेकदा मालक आपल्या पाळीव कुत्र्यांना शौचासाठी घेऊन येतात. पण, अशा उघड्या विष्ठेवर माशा बसून त्यामुळे रोग पसरण्याची शक्यता असते. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने जर कुत्र्याने रस्त्यावर शी केली तर ती मालकानेच उचलावी असा आदेश दिला. तसं न केल्यास मालकांना दंड भरावा लागत आहे. तसंच ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन (एसडब्लूएम) विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १८ दिवसांत कुत्र्यांना शौच करण्यासाठी वापरले जाणारे स्कूपर ( विष्ठा उचलण्यासाठी वापरले जाणारे उपकरण) न वापरल्यामुळे, १२४ मालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

पालिकेद्वारे ही ‘विशेष जनजागृती मोहिम’ राबवण्यात येत असून या मोहिमेद्वारे प्राण्यांच्या मालकांना मार्गदर्शन केलं जात आहे. या मोहिमेतंर्गत सार्वजनिक ठिकाणी आपल्या पाळीव प्राण्याला घेऊन फिरायला येणाऱ्या व्यक्तींना मार्गदर्शन केलं जाणार आहे. याशिवाय पाळीव प्राण्यांना फिरायला घेऊन येणाऱ्या व्यक्तींनी आपल्यासोबत ‘पूप स्कूपर’(शी उचलण्यासाठी) ठेवणं बंधनकारक असल्याची माहितीही दिली जाईल. त्यानंतरही मालकांची शी साफ न केल्यास त्यावर प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारला जात आहे.

- Advertisement -

वांद्र्यात सर्वात जास्त दंड वसूल

सर्वात जास्त एच पश्र्चिम या वॉर्डमधून पालिकेने दंड वसूल केला आहे. तब्बल १२ हजार रुपये एवढा दंड वांद्रे आणि खार या भागातून वसूल केला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर जी उत्तर म्हणजेच माहिम आणि तिसर्या क्रमांकावर डी वॉर्ड म्हणजेच ग्रॅंटरोड आणि मलबार हिलच्या परिसराचा समावेश आहे. डिसेंबरच्या सुरुवातीलाच महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या नेतृत्वाखाली पालिका अधिकाऱ्यांची मासिक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच असं करणार्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली गेली.

याविषयी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या एका अधिका-याने सांगितले की, ” कुत्र्यांनी रस्त्यात शौच केल्यानंतर तर ती विष्ठा स्कूपरने साफ करणे गरजेचे आहे. असं नाही केल्यास ५०० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. “

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -