घरमुंबईसंरक्षण विभागाच्या औषधांची अवैध विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे परवाना रद्द

संरक्षण विभागाच्या औषधांची अवैध विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे परवाना रद्द

Subscribe

सैनिकांच्या औषधांचा देखील काळाबाजार करुन खुल्या बाजारात विक्री होत होती. यातून सैनिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला होता. पण, यावर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने कारवाई करत मुंबईतील २० औषध विक्रेत्यांचे परवाना रद्द करण्यात आले आहेत.

संरक्षण विभागातील आर्मी आणि नेव्हीतील सैनिकांसाठी देण्यात येणाऱ्या औषधांची खुलेआम विक्री मुंबई आणि ठाण्यात होत असल्याची गंभीर बाब फेब्रुवारी महिन्यात उघडकीस आली होती. त्यानुसार, अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून याची गंभीर दखल घेऊन त्वरीत तपासाला सुरुवात केली. या अंतर्गत आता मुंबईतील २० आणि रायगड जिल्ह्यातील २ औषध विक्रेत्यांचे परवाना रद्द करण्यात आले आहेत.

अशी केली कारवाई 

संरक्षण विभागातील औषध विक्री होत असल्याचे समजल्यावर एफडीएच्या इंटीलंजन्स ब्युरोने भायखळा, मुलुंड, सानपाडा, तळोजा इत्यादी ठिकाणांवर कारवाईला सुरूवात केली. सैनिकांच्या औषधांचा देखील काळाबाजार करुन खुल्या बाजारात विक्री होत होती. यातून सैनिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला होता. पण, यावर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने कारवाई करत मुंबईतील २० औषध विक्रेत्यांचे परवाना रद्द करण्यात आले आहेत. तर, रायगड जिल्ह्यातील २ विक्रेत्यांचा समावेश असल्याचे एफडीए अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. पण, हे औषध विक्रेते परवाना रद्द होऊ नये यासाठी प्रयत्न करणार असल्याची ‘ ऑल फूड अॅण्ड ड्रग्ज लायंसन्स होल्डर’ संघटनेकडून सांगण्यात आले. यावर अवैध विक्री करत असलेल्या विक्रेत्यांचे परवाना रद्द करण्याचा निर्णय कायम ठेऊन त्यांचे निवेदन ऐकू नये असे निवेदन या संघटनेकडून देण्यात आले आहे.

“संरक्षण विभागाच्या जवानांची औषधं विक्रेत्यांनी खुल्या बाजारात विकणे ही कृत्य माफ करण्या योग्य नाही. त्यामुळे त्या अवैध विक्रेत्यांचा परवाना रद्द व्हावा यासाठी प्रयत्न केले पाहिजे. शिवाय, विक्रेते ही परवाना रद्द होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांच्या निवेदनाचा विचार करु नये, कारण मेहनतीने कारवाई करणाऱ्या औषध विभागाच्या अधिकाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण होऊ शकते. “- अभय पांडे, अध्यक्ष, ऑल फूड अॅण्ड ड्रग्ज लायंसन्स होल्डर फाउंडेशन

“मुंबईत वीस, पुण्यात पाच, नाशिकमध्ये एक आणि रायगडमध्ये २ अशा औषध विक्रेत्यांचे परवाना रद्द करण्यात आले आहेत. परवाना रद्द झालेले औषध विक्रेते पुन्हा अपील करणाच्या मुद्यावर कोणतेही भाष्य करू शकत नाही.” – जुगलकिशोर मंत्री, सहाय्यक आयुक्त, इंटलीजन्स ब्युरो, एफडीए, राज्य.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -