महिलेच्या मृत्यूनंतर ५ दिवसांनी रिपोर्ट आला Positive! अंत्यविधीला होते ३०० हून अधिक लोकं हजर!

२२ वर्षीय गर्भवती महिलेचा बीएमसी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू

corona patient dead body
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबईत रुग्णालयातील झालेले मोठे दुर्लक्ष उघडकीस आले आहे. मुंबईच्या बीएमसी रुग्णालयात ५ दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या महिलेच्या अंत्यसंस्कार विधीला साधारण तीनशे लोक उपस्थित होते असा परिवारातील सदस्यांकडून सांगितले जात आहे. ही बाब मुंबईच्या जय भारत सोसायटीची आहे. येथे राहणाऱ्या २२ वर्षीय गर्भवती महिलेचा बीएमसी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री महिलेचा मृतदेह कांदिवलीच्या जय भारत सोसायटीमध्ये आणण्यात आला आणि तिच्या कुटुंबीयांनी हिंदू धर्मा अंतर्गत तिचे शेवटचे विधी करण्यात आले होते. मृतदेह पाहण्यापासून शेकडो लोक या अंत्य यात्रेत सामील झाले होते. एवढेच नाही तर या महिलेचा मृतदेह काही तास इमारतीखाली ठेवला आणि आजूबाजूच्या लोकांचा मृतदेह पाहण्यासाठी मोठा घोळखा देखील जमला होता.

अंत्यसंस्कारानंतर ५ व्या दिवशी या महिलेच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. इमारतीचे लोक घाबरले असून त्यांना कोरोनाचा संसर्ग तर होणार नाही न.. या चिंतेत सध्या सगळे आहेत. बीएमसी आरोग्य विभागाची टीम आता मृत महिलेच्या कुटूंबाची चौकशी करीत आहे. चेस द व्हायरस अंतर्गत या महिलेच्या अंत्यविधीत सामील झालेल्या उर्वरित लोकांचा शोध घेत आहे.

अंत्यसंस्कारानंतर पाच दिवसांनंतर जेव्हा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला तेव्हा मृताच्या कुटूंबाने कूपर रुग्णालयाने दुर्लक्ष केले, असा आरोप केला आहे, कुटूंबीयांनी सांगितले आहे की, जर ही महिला कोरोना पॉझिटिव्ह होती तर तिचा मृतदेह का देण्यात आला. आम्ही मृतदेहाची मागणी केली नव्हती. दोनशे ते तीनशे लोक अंतिम विधीमध्ये सामील होण्यासाठी आणि मृतदेह पाहण्यासाठी आले असल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. माझ्या इमारतीतील कोणालाही कोरोनाची लागण झाल्यास तर फक्त कूपर रुग्णालयच जबाबदार असेल असेही या कुटुंबाने म्हटले आहे.


शिवसेना आमदार पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?