घरमुंबईडोंबिवलीचे मासळी मार्केट वादाच्या भोवऱ्यात? पालिकेच्या यादीतून अनेकांची नावे गायब

डोंबिवलीचे मासळी मार्केट वादाच्या भोवऱ्यात? पालिकेच्या यादीतून अनेकांची नावे गायब

Subscribe

डोंबिवलीचे मासळी मार्केट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले असून पालिकेच्या यादीतून अनेकांची नावे गायब असल्याचे समोर आले आहे.

डोंबिवली रेल्वे स्थानकाबाहेरच ६० ते ६५ वर्षे जुने मच्छी आणि मटण मार्केट आहे. याठिकाणी नवीन मार्केट उभारण्यात येणार आहे. त्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, पालिकेच्या यादीतून जुन्या मासळी विक्रेत्यांची नावे गायब झाल्याची तक्रार मासळी विक्रेत्यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. यादीत बोगस नावे घुसविण्यात आल्याचा आरोपही विक्रेत्यांकडून केला जात आहे. त्यामुळे यादीवरून घोळ होण्याची शक्यता निर्माण झाली असून, मासळी मार्केट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

बोगस नावे घुसविल्याचा विक्रेत्यांचा आरोप

१९५४ सालापासून या ठिकाणी मासळी मार्केट आहे. इतक्या वर्षात मासळी मार्केटची डागडुज्जी अथवा दुरूस्तीही करण्यात आलेली नाही. पालिका प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केल्याने मासळी मार्केटची पडझड झाली आहे. रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर आणि रस्त्याने येता जाता नागरिकांना नाकाला रूमाल लावूनच मार्गक्रमण करावे लागते, अशी इथल्या मासळी मार्केटची अवस्था आहे. मार्केटमध्ये कोल्ड स्टोअरेची सुविधा नाही. स्वच्छतेसाठी मुबलक पाणी नाही. अद्यावत मार्केट होण्यासाठी डोंबिवली मच्छी आणि मटण किरकोळ विक्रेता संघाने पालिका आयुक्तांकडे सन २००० पासूनच पाठपुरवा केला. राज्य सरकारच्या मत्स्य विभागाने मंजूरी दिली होती. मात्र, मार्केट कागदावरच राहिले होते. आता मार्केट उभारणीच्या कामाला गती मिळाली असून टेंडरही काढण्यात आले आहे. मात्र, पालिकेने तयार केलेल्या यादीवर संघटनेचा आक्षेप आहे. १९९४ मध्ये नाल्याचे बांधकामाला आणि त्यानंतर नव्या पादचारी पुल उभारणीत अनेकजण विस्थापीत झाले आहेत. अनेक विस्थापीतांचे पुलाखालील गाळयातही पूर्नवसन करण्यात आलं आहे.

- Advertisement -

वडीलोपर्जित व्यवसाय असतानाही माझे नाव आकसापोटी काढल्याची तक्रार पालिका आयुक्तांकडे केली आहे. तसेच पालिकेने यादी बनविताना संघटनेला विश्वासात घेतले नसल्याची बाबही समोर आली आहे.  – दिपक भोईर, देवीचापाडा येथे राहणारे रहिवाशी

सुज्ज मार्केट व्हावे यासाठी आमच्या संघटनेने २००० सालापासूनच मागणी केली आहे. अन्यथा मार्केट दुरूस्ती करण्याची संघटनेला परवानगी मिळावी अशीही मागणी करण्यात आली होती. आता नवीन मार्केट होत असल्याने आनंदच आहे. मात्र, पालिकेने यादी बनविताना मच्छी आणि मटण विक्रेता संघटनेला विश्वासात घेतलेले नाही. त्यामुळे त्यावर आमचा आक्षेप आहे. सर्वांना समान न्याय मिळावा ही संघटनेची मागणी आहे. मात्र, न्याय न मिळाल्यास आंदोलन छेडण्यात येईल.  – वामन म्हात्रे, नगरसेवक तथा अध्यक्ष डोंबिवली मच्छी आणि मटण विक्रेता संघ

- Advertisement -

हेही वाचा – छत्रपती शिवाजी महाराज मासळी बाजार उठणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -