घरमुंबईहिवाळ्यातही मुंबईत पावसाच्या धाराच; ९ जानेवारीलाही पावसाची शक्यता

हिवाळ्यातही मुंबईत पावसाच्या धाराच; ९ जानेवारीलाही पावसाची शक्यता

Subscribe

अवकाळी झालेल्या या पावसाने थंडी गायब होऊन उकाडा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यात मुंबईकरांना उन्हाळ्याचा सामना करावा लागणार आहे.

सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे त्रासलेल्या मुंबईकरांवर शुक्रवारी दुपारनंतर पावसाने शिडकाव केला. त्यामुळे सध्या हिवाळा सुरू आहे का पावसाळा असा प्रश्नच नागरिकांना पडला. अवकाळी झालेल्या या पावसाने थंडी गायब होऊन उकाडा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यात मुंबईकरांना उन्हाळ्याचा सामना करावा लागणार आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ७ जानेवारीला काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. शुक्रवारी मुंबईमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने मुंबईकर त्रस्त झाले होते. अशातच मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये दुपारनंतर काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे मुंबईकरांची त्रेधातिरपिट उडाली. मुंबईसह राज्यात काही ठिकाणी पाऊस झाल्याने राज्यातील थंडी अचानक गायब झाली आहे. अवकाळी पावसाने आंबा व्यावसायिक धास्तावले आहेत. या अवकाळी पावसाने आंबा हंगाम लाबण्याची शक्यता वर्तवली जाते. दक्षिण मध्य अरबी समुद्रापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे शनिवारीही राज्यामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

- Advertisement -

राज्यात ९ जानेवारीला पावसाळी वातावरण

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात ९ जानेवारीपर्यंत पावसाळी वातावरण राहणार आहे. मुंबई, ठाणे, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगावमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर उत्तर महाराष्ट्रामध्ये कमाल तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -