घरमुंबईपरतीच्या पावसाचा मुंबईत दुसरा दिवस

परतीच्या पावसाचा मुंबईत दुसरा दिवस

Subscribe

दक्षिण मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे.

बुधवारी संध्याकाळी मुंबईमध्ये परतीच्या पवसाने दमदार एन्ट्री केली होती. परंतु, फार काळ तो पाऊस पडला नव्हता. आज पुन्हा संध्याकाळी दक्षिण मुंबईमध्ये ढगांच्या कडकडासह पाऊस पडत आहे. त्यामुळे सध्या मुंबईच्या हवेमध्ये गारवा आला आहे. काल पडलेल्या पावसानंतर मुंबईमध्ये नेहमीसारखी उष्णता आज जाणवली नाही. आज वातावरणही ढगाळ होते. संध्याकाळी जोरजोरात थंड वारे वाहू लागले. शिवाय, हवामान विभागानेही आज सायंकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती.

दक्षिण मुंबईमध्ये मुसळधार पाऊस

दक्षिण मुंबईच्या लोअर परळ, प्रभादेवी या विभागात मुसळधार पाऊस पडत आहे. आज मुंबईच्या काही भागांमध्ये रात्री आठ ते साडे आठच्या सुमारास पाऊस पडायला सुरुवात झाली. संध्याकाळपासून सुरु झालेल्या थंड वारा आणि पावसामुळे वातावरणही थंड झाले आहे. गेल्या २४ तासांमध्ये महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये थोड्या-अधिक प्रमाणात पाऊस पडला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पाऊस पडूनही दुष्काळ स्थिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -