घरमुंबईमध्य रेल्वेचे लाखो रुपये पाण्यात

मध्य रेल्वेचे लाखो रुपये पाण्यात

Subscribe

ग्रीन नेट चोरीला

महात्मा गांधींच्या १५०व्या जयंतीनिमित्त मध्य रेल्वेकडून ‘स्वच्छता हीच सेवा’ हा पंधरवडा राबविण्यात आला होता. या दरम्यान रेल्वे स्टेशन आणि रेल्वे परिसरात स्वच्छता ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या होत्या. त्याचप्रमाणे रेल्वे ट्रॅकवर कचरा फेकणार्‍यांविरोधात एक युक्तीही लढवली होती. ज्यात रेल्वे टॅ्रकच्या बाजूला ग्रीन नेट बसविण्यात आली, मात्र, यातील काही ग्रीन नेट चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत.

मध्य रेल्वे नेहमीच स्वच्छता अभियान राबवते. त्यासाठी अनेक जनजागृती कार्यक्रम, उपक्रम मध्य रेल्वेकडून हाती घेण्यात येतात. मात्र, त्यांचा काही फायदा होताना दिसून येत नाही. दोन महिन्यांपूर्वी मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते सॅण्डहर्स्ट रोडपर्यंत अशी एक मोहीम राबविली होती. ज्यामध्ये रेल्वे रुळाजवळ अनधिकृतपणे राहणार्‍या नागरिकांकडून सतत रेल्वे रुळावर कचरा टाकला जात होता. त्यावर आळा बसवण्यासाठी मध्य रेल्वेने उपाय म्हणून लाखो रुपयांची ग्रीन नेट रेल्वे रुळाच्या बाजूच्या कूंपनाला लावण्यात आली होती. जेणेकरून हा कचरा रेल्वे रुळावर येणार नाही. मात्र, दोन महिने पूर्ण होत नाहीत तोच लावलेली ग्रीन नेट खाली पडली आहे. इतकेच नव्हे, तर यातील काही ग्रीन नेट चोरीलासुद्धा गेली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या स्वच्छता अभियानाचा पूर्ण बोजवरा उडालेला आहे. सोबतच मध्य रेल्वेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

- Advertisement -
ग्रीन नेट नको संरक्षण भिंती उभारा 

मध्य रेल्वेच्या मार्गावर अनेक बेकायदेशीर बांधकामे उभी राहिली आहेत. त्यावर कारवाई न करता मध्य रेल्वेकडून आश्रय दिला जात आहे. त्यांच्यावर कायदेशीररित्या कारवाई न करता अशाप्रकारे त्यांना सोडणे अत्यंत चुकीचे आहे. त्यांच्यामुळे मध्य रेल्वेच्या मार्गावर कचरा फेकला जात आहे. अशा लोकांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. सोबतच संरक्षण भिंती बांधणे गरजेचे आहे. त्याऐवजी तात्पूरती मलपट्टी म्हणून मध्य रेल्वे ग्रीन नेट लावून काय साध्य करते. मध्य रेल्वेच्या चुकीच्या धोरणामुळे बेकायदेशीर बांधकाम वाढत असल्याचे मत प्रवाशांनी दैनिक ‘आपलं महानगर’ शी बोलताना व्यक्त केले आहे.

मध्य रेल्वेकडून नेहमीच स्वच्छतेला प्राधान्य दिले जाते. मस्जिद ते सॅण्डहर्स्ट रोड दरम्यान रेल्वे मार्गावर अनेक अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. त्यांच्याकडून अनेक वेळा कचरा रेल्वे रुळावर टाकला जातो. तो कचरा रेल्वे रुळानजीक असलेल्या नाल्यात जाऊन अडकतो. त्यामुळे पावसाळ्यात अनेकदा नाले तुंबले जातात. रेल्वे रुळावर पाणी साचते. त्याचा परिणाम रेल्वेच्या वाहतुकीवर होतो. रेल्वे परिसरात अस्वच्छता निर्माण होते. त्यामुळे आम्ही ग्रीन नेट लावण्याचा निर्णय घेतला व सीएसएमटी स्थानकापासून ते सॅण्डहर्स्ट रोड स्थानकांपर्यंत या ग्रीन नेट लावण्यात आल्या. मात्र, काही लोक या ग्रीन नेट काढून घेऊन जाण्याचा प्रकार करत आहेत, ज्यामुळे रेल्वेचे नुकसान झाले आहे.                                                                                                           ए.के. जैन, वरिष्ठ जसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे 

- Advertisement -

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -