घरमुंबईऑनलाईन नळ कनेक्शनसाठी पालकमंत्र्यांची झाडाझडती

ऑनलाईन नळ कनेक्शनसाठी पालकमंत्र्यांची झाडाझडती

Subscribe

पाणीपुरवठा, नगररचना विभागाला धरले धारेवर

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार नळ कनेक्शन देण्याची प्रक्रिया ऑनलाईन करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी वसई विरार महापालिकेत घेतलेल्या आढावा बैठकीत दिले. त्याचबरोबर नगरचा विभागातील कारभारही पारदर्शीपणे झाला पाहिजे, याबाबतही चव्हाण यांनी अधिकार्‍यांना तंबी दिली. नव्या पालकमंत्र्यांनी वसई विरार महापालिकेत अधिकार्‍यांची आढावा बैठक घेऊन पाणीपुरवठा आणि नगररचना खात्यासह विविध विभागाची झाडाझडती घेतली. पाणीपुरवठा आणि नगररचना विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढत त्यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले.

पाणीपुरवठा आणि नगररचना विभागात पारदर्शकता नसल्याचे स्पष्ट मत त्यांनी नोंदवले. या दोन्ही विभागात मोठ्या प्रमाणावर गैरकारभार होत असल्याचे आपल्या निदर्शनास आले आहे. नळ कनेक्शन ऑनलाईन देण्याची प्रक्रिया सुुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश असताना महापालिकेचे अधिकारी त्याबाबत उदासीन असल्याबदद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे नळ कनेक्शन प्रक्रिया ऑनलाईन केली असल्याचे सांगणार्‍या अधिकार्‍यांनी फक्त दोनच तेही ट्रायलचे ऑनलाईन अर्ज आल्याची माहिती दिली. महापालिकेच्या अधिकार्‍यांना यावेळी प्रात्यक्षिक दाखवून नळ कनेक्शनची प्रक्रिया ऑनलाईन केल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात मात्र यावेळी ऑनलाईनची प्रक्रिया सुलभपणे होत नाही असे दिसून आले.

- Advertisement -

तसेच नगररचना विभागातून बांधकाम परवानगी देण्यास विलंब होत असल्याबदद्ल चव्हाण यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले. नगररचना विभागात पारदर्शीपणा येण्यासाठी अधिकार्‍यांनी कागदपत्रांची पूर्तता झालेली प्रकरणे त्वरित मार्गी लावावीत, असेही चव्हाण यांनी सांगितले. महापालिकेतील अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे महापालिकेचा कारभार कंत्राटी पद्धतीने सुरू आहे. त्यासाठी रिक्त पदांची तातडीने भरती केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -