घरमुंबईबारामतीच्या घोणस सापाची परळच्या 'हाफकीन'मध्ये प्रसुती

बारामतीच्या घोणस सापाची परळच्या ‘हाफकीन’मध्ये प्रसुती

Subscribe

गेल्या महिन्यात बारामती तालुक्यात घोणस प्रजातीतला साप सापडला होता. त्याला हाफकिनमध्ये आणण्यात आले. गेल्या आठवड्यात एकाचवेळी तिला ३६ पिल्ले झाली.

कोल्हापुरात तीन घोणस सापांनी ९६ मादींच्या पिल्लांना जन्म दिल्याची घटना ताजी असतानाच परळच्या हाफकिनमध्ये बारामतीच्या घोणस सापाने ३६ पिल्लांना जन्म दिला. गेल्या आठवड्यात या सापाने पिल्लांना जन्म दिला असून या जातीच्या सापाने एकाचवेळी ३६ पिल्लांना जन्म दिल्याचा हा दुर्मिळ योग असल्याचे हाफकिन संस्थेच्या संचालिका डॉ. निशिगंधा नाईक यांनी सांगितले.

russell viper in halfkin
या घोणस सापाला झाली ३६ पिल्ले

हाफकिनमध्ये सापावर संशोधन

’हाफकीन‘मध्ये सापाच्या विषावर विशेष संशोधन केले जाते. सर्पदंश विरोधी लस आणि अन्य उपायांसाठी हे संशोधन चालते. संशोधनासाठी लागणारे सापाचे विष उपलब्ध व्हावे यासाठी पशुवैद्य डॉ. मृणाल घाग-सावंत, सर्पमित्र आशिर्वाद रावराणे, रोहन निंबाळकर, वागेश वाल्हेकर आणि परिचारक विक्रांत घाडी हे राज्यभरातून साप पकडून आणतात. गेल्या महिन्यात बारामती तालुक्यात घोणस प्रजातीतला साप सापडला होता. त्याला हाफकिनमध्ये आणण्यात आले. गेल्या आठवड्यात एकाचवेळी तिला ३६ पिल्ले झाली.

- Advertisement -
वाचा-सापांना पाळणारी शाळा

नागिणीने दिली २१ अंडी

हाफकिनमध्ये पालघरहून२ मे रोजी नागिण पकडून आणली आहे. तिने एकाचवेळी २१ अंडी दिली आहेत. नाग स्वत:ची अंडी उबवत नाहीत. त्यामुळे ही अंडी कृत्रिमरित्या उबवण्यात आली. त्यातील एका अंड्यात पिल्लू असल्याची माहितीही डॉ. नाईक यांनी सांगितले आहे.

हाफकीनमध्ये सर्प जीवनाला अत्यंत अनुकूल वातावरण निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे येथे सापांचे यशस्वीरित्या प्रजनन होते. देशभरात दरवर्षी सरासरी तीन लाख माणसांना सर्पदंश होतो. त्यातील ५० हजार त्यातच दगावतात. तर दीड लाखांना त्यामुळे गंभीर स्वरुपाचं अपंगत्व येते. या पार्श्वभूमीवर सध्या सर्पविष संशोधनासाठी विशेष प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्या दृष्टीने या सर्वांचा पुढे संशोधनाला उपयोग होईल. कालांतराने वन विभागाशी चर्चा करुन या पिल्लांना सोडण्यात येईल’
डॉ. निशिगंधा नाईक, हाफकीन संचालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -