घरमुंबईदसरा मेळाव्यासाठी शिवसेनेने 'अशी' जमवली गर्दी?

दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेने ‘अशी’ जमवली गर्दी?

Subscribe

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला दरवर्षी मोठ्या संख्येने गर्दी जमा होते. मात्र यंदा यातल्या बऱ्याच लोकांना आपण नक्की कशासाठी इथे आलो आहोत, हेच माहीत नसल्याचं समोर आलं आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा म्हटला की मोठ्या संख्येने शिवसैनिक शिवाजी पार्कवर येत असतात. मात्र यावेळी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे यंदाच्या मेळाव्याला महत्त्व आहे. त्यातच या दसरा मेळाव्याला ५ लाख शिवसैनिक उपस्थित असावेत, असे आदेशच मातोश्रीवरून आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे अनेकांना घाम फुटल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे जमवाजमव करताना शिवसेना पदाधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाल्याचे पहायला मिळाले.


ब्रेकिंग न्युज: पंजाबमध्ये भयानक दुर्घटना; रेल्वेने ५० पेक्षा अधिक नागरिकांना चिरडले

- Advertisement -

इगतपुरीवरून आलेल्या महिलांमध्ये संभ्रम

दरम्यान, या मेळाव्यासाठी इगतपुरी वरून आलेल्या महिलांना तुम्ही नेमकं मुंबईत कशासाठी आलात? हे विचारले असता त्यांना काहीच ठाऊक नसल्याचे समोर आले. तसेच आम्ही मुंबई फिरायला आलो असून, कोणत्यातरी साहेबांसोबत मीटिंग असल्याचे आम्हाला आणताना सांगण्यात आल्याचं इथे आलेल्या महिलांनी ‘माय महानगर’शी बोलताना सांगितले.


उद्धव ठाकरेंवर वाचा काय म्हणतायत नारायण राणे – ‘राम मंदिर सोडा, आधी बाळासाहेबांचे स्मारक बांधा’


आम्ही जवळपास ८० जण इगतपुरीवरून आलो असून, आम्ही मुंबई पाहण्यासाठी आलो. नेमका काय कार्यक्रम आहे हे आम्हाला माहीत नाही. पण कार्यक्रम संपल्यावर आम्ही पुन्हा जाऊ. आमची सर्व व्यवस्था सभापती काऊजी ठाकरे यांनी केली आहे.

शेवंती आगीवले, आदिवासी महिला

- Advertisement -

इतरही भागातून आलेल्या महिलांची हीच परिस्थिती

सगळ्यात महत्वाचे म्हणजे मुंबई शहरासह इतर शहरी भागातील महिला वगळता ग्रामीण भागातून आलेल्या महिलांना मात्र आपण नेमके मुंबईत कशासाठी आलोय? हेच ठाऊक नव्हते. तसेच ग्रामीण भागातून यंदा पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने गाड्या आल्याची माहिती एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘माय महानगर’ला दिली. त्यामुळे शक्ती प्रदर्शन करण्यासाठी शिवसेनेने माणसं जमवलीत का? असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होऊ लागला आहे.


दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंची घोषणा – २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार! वाचा सविस्तर

Shivsena Dussehra Melava
उद्धव ठाकरेंची शिवसेना दसरा मेळाव्यात घोषणा

समस्या सोडवण्याचं मिळालं आश्वासन

महत्वाचं म्हणजे इगतपुरीवरून आणलेल्या आदिवासी महिलांनी ‘आपल्या समाजाच्या खूप समस्या असून मुंबईत गेल्यावर त्या समस्या सुटतील असे सांगण्यात आल्याचे सांगितले.


तुम्ही हे वाचलंत का? – शिवसेना २३६ व्या वेळी सत्तेतून बाहेर पडणार?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -