घरमुंबईधावत्या ट्रेनमधील शॉपिंगचा बाजार उठणार!

धावत्या ट्रेनमधील शॉपिंगचा बाजार उठणार!

Subscribe

अल्प प्रतिसादामुळे कंत्राटदार हतबल

मोठा गाजावाजा करत पश्चिम रेल्वेने धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी शॉपिंग योजना सुरु केली होती. मात्र त्याला मागील काही महिन्यापासून फारसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे ही योजना चालवणारा कंत्राटदार सोडून जाण्याच्या मार्गावर आहे. पश्चिम रेल्वेच्या या महत्वाकांक्षी योजनेचा फियास्को झाल्यामुळे रेल्वे प्रशासनने ती बंद करण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यामुळे धावत्या ट्रेनमधील बाजार उठला आहे.

भारतीय रेल्वेचे उप्तादन वाढविण्यासाठी न्यू इनोव्हेटिव्ह नॉन फेअर रेव्हेन्यू आयडीयाज स्कीम (एनआयएनएफआरआयएस) मार्फत पश्चिम रेल्वे अनेक योजना राबवित आहे. नुकतेच पश्चिम रेल्वेने ३९ लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये मसाजची सुविधा देण्याची जाहीर केले होते. यापूर्वीसुद्धा पश्चिम रेल्वेने धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी शॉपिंग सुविधा सुरू केली होती. ही सेवा जानेवारी २०१९ पासून पश्चिम रेल्वेच्या शताब्दी एक्स्प्रेसमध्ये सुरू करण्यात आली होती. टप्याटप्याने या योजनेचा विस्तार पश्चिम रेल्वेच्या 16 मेल आणि एक्सप्रेस ट्रेनमध्ये चालू करण्यात आला होता. यासाठी पश्चिम रेल्वेने मेसर्स एचबीएन प्रायव्हेट लिमिटेड या नावाच्या कंपनीला पाच वर्षाच्या कालावधीसाठी 3.66 कोटी रुपयांचे कंत्राट दिले.

- Advertisement -

ट्रेनमध्ये सौंदर्यप्रसाधने, घरातील आणि किचनमधील साहित्य आणि फिटनेसचे साहित्य इत्यादी वस्तू विकण्याची परवानगी दिली आहे. मात्रही योजना सुरूच होताच प्रवाशांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे कंत्राटदाराला मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे कंत्राटदार रेल्वेशी झालेला कंत्राट करार सोडून जाणार आहे. परिणामी पश्चिम रेल्वेची शॉपिंग योजना बंद पडण्याच्या मार्गवर आहे. या संबंधित आम्ही रेल्वे अधिकार्‍यांना विचारणा केली असता. त्यांनी सांगितले की, प्रवाशांकडून या शॉपिंगला प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे कंत्राटदार सोडून जाणार आहे. त्यामुळेही पश्चिम रेल्वेला ही योजना बंद करावीत लागणार आहे.

अशी होती योजना?


धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांना शॉपिंग करता येणार होती. या शॉपिंगमध्ये सौंदर्यप्रसाधने, घरातील आणि किचनमधील साहित्य आणि फिटनेसचे साहित्य इत्यादी वस्तूंचे धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांना शॉपिंग करता येत होते. यासाठी ट्रेनमध्ये नियुक्त केलेल्या कंपनीचे दोन सेल्समन होते. या सेल्समनना कंपनीचे ओळखपत्र आणि गणवेश देण्यात आले होते. ही शॉपिंग प्रवासी क्रेडिट किंवा डेबिट कार्ड अथवा कॅश देऊन करण्याची सुविधा होती. मात्र या शॉपिंग योजनेला प्रवाशांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कंत्राटदाराला आपले कंत्राट सोडून जाण्याची वेळ आली आहे.

- Advertisement -

धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी जानेवारीपासून शॉपिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र कंत्राटदारालाही सेवा देणे परवडत नसल्यामुळे कंत्राटदार सोडून जात आहे. त्यामुळे योजना बंद करावी लागणार आहे.
– जागृती सिंगला, सीनियर कमर्शियल मॅनेजर, पश्चिम रेल्वे

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -