घरमुंबईभिवंडीत पोलिसांच्या नाकाबंदीत दारू माफिया अडकले

भिवंडीत पोलिसांच्या नाकाबंदीत दारू माफिया अडकले

Subscribe

सतराव्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तालुका पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात कडक पावले उचलली आहेत. काल सायंकाळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वैभव देशपांडे, पोशी.शांताराम काळे, बाबासाहेब बोरकर, विकास आव्हाड आदींच्या पोलीस पथकाने वाहन तपासणीसाठी शेलार (नदीनाका) येथे अचानक नाकाबंदी लावली होती. या नाकाबंदीत दोघे दारू माफिया सापडले आहेत.

मात्र पोलिसांकडून सँट्रो कारची तपासणी सुरु असताना एक दारूमाफिया पोलिसांची नजर चुकवून पसार झाला असता त्यास पोलिसांनी सापळा लावून गजाआड केले. शनमुगन शेलुराज कवंड (४०) व संजय अंबादास जुकर (३२ दोघेही रा.नागांव ) असे अटक केलेल्या दारू माफियांची नांवे आहेत.या दोघांनी सँट्रो कारमधून बेकायदेशीरपणे ४० हजार ५०० रुपये किंमतीचे बॅग पायपर ,इंपिरियल ब्लु ,रॉयल स्टँग ,रोमॅनो व्होडका ,मॅकडॉल ,किंगफिशर स्ट्रॉंग बियर ,एलपी स्ट्रॉंग बियर आदी देशी ,विदेशी दारूच्या बाटल्यांचे बॉक्स विक्रीसाठी घेऊन वाड्याकडून येत असताना ते दोघेही पोलिसांच्या तावडीत सापडले.

- Advertisement -

मात्र यातील संजय जुकर हा पोलिसांची नजर चुकवून पळून जाण्यात यशस्वी ठरला होता.पोलिसांनी त्याला सापळा लावून गजाआड केले.शनमुगन यास एक दिवसाची पोलीस कोठडी तर संजय जुकर याची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.पोलिसांनी १ लाख रुपये किंमतीची सँट्रो कार व ४० हजार ५०० रुपये किंमतीचा अनधिकृत देशी ,विदेशी दारूचा साठा असा १ लाख ४० हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -