घरमुंबईचर्चा तर होणारच

चर्चा तर होणारच

Subscribe

मुंबईतील ‘त्या’ पोस्टरने लक्ष वेधले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमी आपल्याला एकमेकांविरोधात आरोप- प्रत्यारोपांच्या फैर्‍या झाडताना दिसले आहेत. मात्र हे दोन दिग्गज नेते जर एकाच पोस्टरवर झळकले असे जर तुम्हाला कोणी सांगितले, तर विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. मुंबईतील एका शुभेच्छांंच्या पोस्टरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांचे फोटो झळकल्याने सध्या राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचविल्या आहेत. या पोस्टरमुळे आता अजित पवार देखील भाजपात जाणार का? अशी गंमतीभर चर्चा सध्या राजकीय विश्वात सुरू झाली असून मुंबईत प्रसिद्ध झालेले हे पोस्टर उभ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेत आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस २२ जुलै रोजी पार पडला. आपल्या वाढदिवसादिवशी कोणीही पोस्टर्स लावू नये,असे थेट आवाहन मुख्यमंत्र्यांनी या अगोदरच केले होते. मात्र त्यानंतरही मुंबईत प्रसिद्ध झालेल्या एका पोस्टर्समुळे महाराष्ट्रात नवी चर्चा सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनतर्फे हे पोस्टर लावण्यात आले. मुंबईतील सीएसटी परिसरातील फ्रीवे जवळ हे पोस्टर लावण्यात आले असून या पोस्टरमध्ये युनियनतर्फे मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्या फोटोसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नुकतीच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड झालेले चंद्रकांत पाटील यांचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानंतर दुसर्‍या बाजूला थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील यांचाही फोटो आहे. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी लढविणारे नरेंद्र पाटील यांचा देखील फोटो असल्याने या पोस्टरवर अनोखी युतीच मुंबईकरांना पहायला मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -