घरमुंबईरेल्वे स्थानकांतील वॉटर व्हेडिंग कोमात

रेल्वे स्थानकांतील वॉटर व्हेडिंग कोमात

Subscribe

आयआरसीटीसी कंपनीने कंत्राटी तत्त्वावर व्हेंडिंग मशीन मध्य रेल्वेवर बसविण्यात आल्या आहेत. मात्र गेल्या एका वर्षातच या वॉटर वेंडिंग मशीनचा बोजवारा उडाला आहे.अनेक वॉटर व्हेडिंग मशिन नादुरस्त असल्यामुळे प्रवाशांना जास्त पाणी घ्यावे लागत आहे. त्यामुळे वॉटर व्हेडिंग मशिनवर कार्यरत असलेल्या कर्मचारी आणि रेल्वे प्रवाशांमध्ये वाद निर्माण होताना दिसून येत आहे. यासंबंधी प्रवाशांनी तक्रारी करूनसुध्दा रेल्वे प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे प्रवाशांनी आयआरसीटीच्या कारभारवर नाराजी व्यक्त केली आहे.

आयआरसीटीसीने सर्व रेल्वे स्थानकांवर वॉटर वेंडिंग मशीन बसविल्या आहेत. या मशीनद्वारे प्रवाशांना ‘आरओ’चे शुद्ध बॅक्टेरियामुक्त पाणी माफक दरात विकले जाते. ब्रॅण्डेड कंपनीच्या बाटलीबंद पाण्याची किंमत जादा असल्याने अशा प्रकारे वॉटर वेंडिंग मशीनद्वारे शुद्ध पाणी मिळू लागल्यानेही संकल्पना खूप कमी कालावधीत लोकप्रिय झाली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकावर सरासरी 300 पेक्षा जास्त वॉटर वेंडिंग मशीन बसविण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये 300 मिली, 500 मिली, 1 लिटर, 2 लिटर, आणि 5 लिटर आरओ’चे शुद्ध पाणी माफक दरात प्रवाशांना विकत घेता येते.

- Advertisement -

मात्र मशिन नादुरस्त असल्यामुळे फक्त 500 मिमि आणि 1 लिटरच पाणी मिळत असल्यामुळे प्रवाशांना तीनशे मिलीलिटर पाणी विकत घेता येत नाही. तसेच रेल्वेमध्ये प्लास्टिक बंदी असल्यामुळे प्रवाशांना बॉटल सुध्दा मिळत नाही. त्यामुळे या वॉटर वेंडिंग मशीन आज कुचकामी ठरत असल्याचा आरोप रेल्वे प्रवाशांनी केला आहे. वॉटर वेंडिंग मशीन काम करणार्‍या कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये यामुुळे सतत वाद निर्माण होत असल्यामुळे कर्मचारी सुध्दा त्रस्त झाले आहे. यासंबंधी आयआरसीटीच्या अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

कर्मचारी सुध्दा त्रस्त

- Advertisement -

मध्य रेल्वेवर प्लास्टिक बंदीपूर्वी वॉटर वेंडिंग मशीनवर ग्लास आणि प्लॉस्टिक बॉटल उपलब्ध होत्या. मात्र जेेव्हापासून मध्य रेल्वेवर प्लास्टिक बंदी करण्यात आली. तेव्हापासून मशीनवर फक्त बॉटल घेऊन येणार्‍या प्रवाशांना पाणी मिळत आहे. तीनशे मिलिलिटर पाणी विकत घेणार्‍या प्रवाशांना मशीनवर असलेले कर्मचारी स्वत:च्या बॉटलने पाणी देताना आज चित्र दिसून येत आहे. त्यामुळे या बॉटल सुध्दा कर्मचार्‍यांना विकत घ्यावी लागत आहे. त्यामुळे वॉटर वेंडिंग मशीन काम करणारे सुध्दा आज त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे या मशीनवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना चार महिन्यांचे वेतन सुध्दा मिळालेले नाही. त्यामुळे या कर्मचार्‍यांना दुहेरी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

पाणी कंटेनर
300 मिली 1 रू. 2 रु.
500मिली 2 रु . 5 रू.
1 लिटर 5 रू. 8 रु.
2 लिटर 8 रू. 12 रू.
5 लिटर 20 रू. 25 रु.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -