घरताज्या घडामोडीजाणून घ्या का झाली मुंबईची बत्ती गुल?

जाणून घ्या का झाली मुंबईची बत्ती गुल?

Subscribe

हा तांत्रिक बिघाड नेमका काय आहे?

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई आणि उपनगरातील अनेक भागात आज सकाळच्या सुमारास अचानकपणे वीजप्रवाह खंडित झाला. टाटाकडून येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचे बेस्टने म्हटले आहे. मात्र, हा नेमका तांत्रिक बिघाड आहे, हे ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ‘महापारेषणच्या ४०० KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट १ देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट २ वर होता. मात्र, सर्किट २ मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई आणि ठाण्यामधील बहुतांश भागातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे’. मात्र, या तांत्रिक बिघाडामुळे मुंबईमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण, अदानी, बेस्ट, टाटा अशा सर्वच वीज वितरकांच्या सेवेला फटका बसला आहे.

- Advertisement -

देखभाल दुरुस्तीचे काम सुरू असताना कळवा-पडघा येथील वीज उपकेंद्रात थोडा बिघाड झाला. त्यामुळे मुंबईतील वीज सेवा खंडीत झाली. मात्र, विद्युत विभागातील कर्मचारी युद्ध स्तरावर काम करत असून काही तासातच वीज पुरवठा सुरळीत होईल. – नितीन राऊत; ऊर्जा मंत्री


हेही वाचा – Breaking: वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे मुंबईतील लोकलसेवा ठप्प


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -