घरटेक-वेकगुगलवर ‘हे’ सर्च कराल तर थेट जाल जेलमध्ये

गुगलवर ‘हे’ सर्च कराल तर थेट जाल जेलमध्ये

Subscribe

गुगलचा वापर आपल्याला धोक्यातही आणू शकतो. त्यामुळे गुगलवर कोणतीही माहिती शोधण्यापूर्वी दहा वेळा विचार करा.

आजच जग हे डिजिटल जग आहे. इथे कोणतीही गोष्ट हवी असेल तर ती डिजिटल माध्यमातून मिळावता येते. आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी आपण गुगलवरून शोधू शकतो. गुगलला सगळ्या गोष्टी माहिती असतात. पण गुगलसारख्या माध्यमातून मिळवलेली प्रत्येक माहिती ही खरीच असेल असे नाही. काही वेळा गुगलचा वापर आपल्याला धोक्यातही आणू शकतो. त्यामुळे गुगलवर कोणतीही माहिती शोधण्यापूर्वी दहा वेळा विचार करा. गुगलवर सगळ्या गोष्टींची माहिती मिळत असली तरी गुगलवर काही गोष्टी सर्च केल्यास आपण थेट जेलमध्ये जाऊ शकतो. जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या गुगलवर सर्च करू नये.

  • बऱ्याच जणांना काही गोष्टी कशा तयार करतात हे जाणून घेण्यात रस असतो. पण सगळ्यात गोष्टी गुगलवर सर्च करताना विचार करून सर्च करा. बॉम कसा तयार करतात असे कधीही गुगलवर सर्च करू नका. आपला आयपी Adress सुरक्षा यंत्रणापर्यत पोहचतो. सुरक्षासंस्था आपल्याविरूद्ध कारवाई करू शकते. त्यामुळे आपल्यावर जेलमध्ये जाण्याची वेळ येऊ शकते.
  • गुगलवर आपला इमेल आयडी शोधू नका. गुगलवर आपले पर्सनल अकाउंट कधी सर्च करू नका. यामुळे आपले अकाऊंट हँक होऊ शकते. आपलाकडे असलेला पासवर्ड लीक होऊ शकतो. पासवर्ड लीक झाल्याने आपल्या नावाने घोटाळे करू शकतात.
  • गुगलवर औषधे शोधणे टाळा. बऱ्याचदा आपण गुगलवर औषधे शोधतो. पण प्रत्येक वेळी गुगल योग्य औषध सांगेल असे नाही. त्यामुळे आपल्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.
  • बऱ्याचदा आपल्याला स्ले स्टोअर कोणतेही App सापडले नाही तर आपण ते गुगुलवर शोधतो. पण बऱ्याचदा गुगलवर काही बनावट App डाउनलोड होतात. असे App आपल्या डिव्हाइसला हानी पोहचवून आपला डेटा चोरी करतात. त्यामुळे गुगलवरून App शोधणे टाळा.

    हेही वाचा – दिवाळी साजरी करण्यासाठी एटीएममध्ये चोरीचा प्रयत्न, दोघांना अटक

    - Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -