घरटेक-वेकया स्मार्टफोनमध्ये ३० एप्रिलपासून बंद होणार फेसबुक, इंस्टा आणि मॅसेंजर

या स्मार्टफोनमध्ये ३० एप्रिलपासून बंद होणार फेसबुक, इंस्टा आणि मॅसेंजर

Subscribe

मायक्रोसॉफ्ट स्टोअरवर फेसबुक, मॅसेंजर आणि इंस्टाग्राम टॉप अॅप्स आहेत, परंतु ३० एप्रिलनंतर किती युजर्स याने प्रभावित होतील याची अचूक आकडेवारी देता येणार नाही.

काही स्मार्टफोन्समध्ये ३० एप्रिलपासून फेसबुक, इंन्स्टाग्राम सोबत मॅसेंजर अॅप्लिकेशन सपोर्ट करणार नाही. मायक्रोसॉफ्ट कंपनीने हे स्पष्ट केले आहे की, Windows च्या स्मार्टफोन्सना फेसबुक सपोर्ट करणं बंद होणार आहे. Windows Phone असणाऱ्या युजर्सना सोशल मीडिया अॅक्सेस करायचे असल्यास इतर स्मार्ट फोनचा आधार घ्यावा लागणार आहे.

Windows चे स्मार्टफोन कंपनीने तयार बंद केले आहे. तसेच, मायक्रोसॉफ्टने सर्वात पहिले आपले स्मार्टफोन लॉन्च करणे बंद करण्यात आले आहे. Windows च्या स्मार्ट फोनमध्ये whatsapp पहिलेच सपोर्ट करणं बंद झाले होते. परंतु, सध्या Windows च्या फोनमध्ये whatsapp बंद होणार की नाही, हे आता तरी स्पष्ट करण्यात आले नाही.

- Advertisement -

मायक्रोसॉफ्टने स्वतः जाहीर केले की, डिसेंबर २०१९ नंतर Windows च्या फोन्सना सिक्युरिटी अपडेट्स मिळणार नाही. हा फोन वापरणाऱ्या युजर्सना इंस्टाग्रामचे नोटिफीकेशन मिळाले असून ३० एप्रिलला Windows फोनमध्ये इंस्टाग्राम उपलब्ध होणार नाही. परंतु युजर्सना वेब ब्राऊजर वरून इंस्टाग्राम वापरता येणार आहे.

Windows च्या फोनमध्ये आता इंस्टाग्रामनंतर फेसबुक सपोर्ट करणार नाही असे मायक्रोसॉफ्ट कंपनीने सांगितले आहे. मायक्रोसॉफ्ट स्टोअरवर फेसबुक, मॅसेंजर आणि इंस्टाग्राम टॉप अॅप्स आहेत, परंतु ३० एप्रिलनंतर किती युजर्स याने प्रभावित होतील याची अचूक आकडेवारी देता येणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -