घरटेक-वेकसरकारी कर्मचाऱ्यांसाठी गाडी घेण्याची सुवर्णसंधी; Mahindra देतेय खास ऑफर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गाडी घेण्याची सुवर्णसंधी; Mahindra देतेय खास ऑफर

Subscribe

सणासुदीच्या काळात देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने (Mahindra & Mahindra) सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खास ऑफर आणली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महिंद्रा अँड महिंद्राने फेस्टिव्ह ऑफर आणली असून सरकारी कर्मचाऱ्यांना देशभरात वाहन खरेदीदरम्यान मोठी सूट मिळणार आहे. तसेच इतरही अनेक फायदे मिळतील.

कंपनीने ही ऑफर ‘सरकार २.०’ या नावाने सादर केली असून या ऑफर्सनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना वाहन खरेदी करताना ११ हजार ५०० रुपयांपर्यंत रोख सूट मिळणार आहे. शिवाय, कमी व्याजदर, मासिक हफ्त्यांमध्ये सहजता आमि इतर फायदे मिळणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी यी योजना आहे. वाहन खरेदी करताना कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही, तसेच ७.२५ टक्के व्याजदरावर वाहन खरेदी करता येणार आहे. १ लाखामागे ७९९ रुपये इतका मासिक हफ्ता असणार आहे. हफ्ते भरण्याची मुदत ८ वर्षांपर्यंत आहे. याशिवाय, इतर अनेक फेस्टिव्ह ऑफर्स कंपनी देत आहे.

- Advertisement -

ऑक्टोबरमध्ये Mahindra ची विक्री घटली

कंपनीला कोरोना, लॉकडाऊनचा फटका बसला असून ऑक्टोबरमध्ये १४ टक्क्यांनी विक्रीत घट झाली आहे. ऑक्टोबरमध्ये केवळ ४४ हजार ३५९ वाहनांची विक्री झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत विक्री १४. ५२ टक्क्यांनी घटली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ५१ हजार ८९६ वाहनांची विक्री झाली होती.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -