‘ह्युंदाई’ ची पहिली इलेक्ट्रिक कार भारतात लाँच

इलेक्ट्रिक एसयूव्ही असलेल्या कारची किंमत २५ लाख ३० हजार रुपये

Mumbai

भारतात ह्युंदाई कंपनीची इलेक्ट्रिक कार ‘कोना’ लाँच करण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक एसयूव्ही असलेल्या कारची किंमत २५ लाख ३० हजार रुपये आहे.

Hyundai KONA कारचे वैशिष्ट्ये

  • अवघ्या ५७ मिनिटात फुल चार्ज करू शकता येते. एकदा चार्ज केल्यानंतर ही कार ४५२ किलोमीटर अंतर पार करू शकते.
  • ह्युंदाई कोना ला स्टँडर्ड एसी सोर्समधून चार्ज केल्यास ६ तास १० मिनिटे लागतील.
  • या कारमध्ये इको, कॉम्फोर्ट आणि स्पोर्ट हे तीन ड्राइव्ह मोड देण्यात आले आहेत.
  • वन स्पीडचा ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
  • ही कार केवळ ९.७ सेकंदात शून्य ते १०० किलोमीटर प्रती तास वेग पकडू शकते.

या कारमध्ये होम चार्जर दिला जाणार असून गिऱ्हाईकांसाठी डीलरशीपमध्ये चार्जिंग स्टेशन लावण्यात येणार असून भारताच्या चार मोठ्या असणाऱ्या शहरात इंडिया ऑईल पेट्रोल पंपाजवळ चार्ज करण्यासाठी चार्जिंग स्टेशन बनवण्यात येणार आहेत. या कारला एकदा फुल चार्ज केल्यानंतर ती ४५२ किलोमीटर अंतर पार करू शकेल, असे कंपनीने म्हटले आहे.

तसेच, या कारमध्ये १०० केव्हीची मोटर देण्यात आली असून ती १३१ बीएचपीचे पॉवर इंजिन देते. या कारमध्ये ८ इंचाचा फ्लोटिंग टचस्क्रीन इनफोटेनमेंट सिस्टम देण्यात आला आहे. या कारला भारतात कसा प्रतिसाद मिळणार हे लवकरच कंपनीकडून सांगण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here