घरटेक-वेक'या' दिवशी लाँच होणार iPhone 12; सीरीजअंतर्गत 4 नवे आयफोन लाँच होण्याची...

‘या’ दिवशी लाँच होणार iPhone 12; सीरीजअंतर्गत 4 नवे आयफोन लाँच होण्याची शक्यता

Subscribe

जाणून घ्या किती असणार किंमत

पुढच्या महिन्यात 13 ऑक्टोबर रोजी अॅपल iPhone 12 लाँच करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच अॅपल आपली मोस्ट अवटेड सीरीज iPhone 12 लाँच करू शकते. अॅपल इंटरनेट सॉफ्टवेअर अँड सर्विसचे सिनियर वाइस प्रेसिंडेंट अॅडी क्यू आगामी आयफोन आणि त्याच्या 5जी क्षमतेबाबत यूके कॅरियर प्रेझेंटेशनमध्ये यासंदर्भातील माहिती दिली आहे. दरम्यान अॅपलच्या पुढिल 5 जी आयफोनपासून काही दिवसच लांब आहोत. 5 जी इनोवेशनसाठी हा फोन मोठा बूस्ट असणार आहे. याला लाँच करण्यासाठी कंज्युमरने वर्षभरासाठी तयारी केली आहे. तसेच अॅपलचा युरोपमधील नंबर वन पार्टनर बनण्यासाठीही तयार आहे.

iPhone 12 चे दोन दुसरे मॉडल्स iPhone 12 आणि iPhone 12 pro असणार आहेत. यापैकी स्वस्त iPhone 12 Pro मॉडलची किंमत 999 डॉलर एवढी असण्याची शक्यता आहे. तर iPhone 12 Pro max जवळपास 1,099 डॉलर एवढ्या किमतीसह लाँच करण्याची शक्यता आहे. या दोन्ही फोन्सच्या रियर पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

- Advertisement -

यासह iPhone 12 सीरीज अंतर्गत स्मार्टफोन्सचे हे चार मॉडल् मार्केटमध्ये येण्याची शक्यता असून ज्यांची किंमत अपेक्षेपेक्षा जास्त सांगण्यात येत आहे. एका रिपोर्टनुसार, आयफोनच्या या सीरीजच्या किंमतींमध्ये जवळपास 50 डॉलर (सुमारे 3,680 रुपये) वाढ झाली आहे. हे पाहता अंदाज व्यक्त केला जाऊ शकतो की, iphone 12 सीरीजच्या किंमती जास्त असू शकतात.

iPhone 12 सीरीजअंतर्गत चार नवे आयफोन लाँच होणार असून ज्यामध्ये दोन प्रीमियम व्हेरिएंट्सचा समावेश असण्याची शक्यता आहे. काही दिवसापूर्वीच खुलासा झाला आहे की, अपकमिंग 5.4 इंच डिस्प्ले असणाऱ्या आयफोन 12 ची सुरुवातीची किंमत 649 डॉलर एवढी असू शकते. तसेच 6.1 इंचाचा डिस्प्ले असणाऱ्या आयफोन 12 ची किंमत 749 डॉलर इतकी असू शकते, असे सांगितले जात आहे.


Video Viral: ‘भारत सीमेवर जाताना चीनी सैनिकांना भीती वाटते, रडूही कोसळतं’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -