घरटेक-वेकNikon Coolpix: भन्नाट फीचर्सचा नवा कॅमेरा

Nikon Coolpix: भन्नाट फीचर्सचा नवा कॅमेरा

Subscribe

निकॉन कुलपिक्स P1000 हा नवा कॅमेरा सर्वात मोठी 'ऑप्टिकल झुम लेन्स' असलेला कॅनेरा आहे. या कॅमेराच्या झुमिंगची क्षमता 125x optical इतकी आहे.

फोटोग्राफीची पॅशन अनेक लोकांमध्ये पाहायला मिळते. बरेचजण व्यावसायिक फोटोग्राफीलाही पसंती देतात. या प्रकारातील फोटोग्राफी करण्यासाठी सर्वप्रकारच्या उपयुक्त फिचर्सनी सुसज्ज अशा प्रोफेशनल कॅमेरांची गरज असते. जगभरातील अनेक कंपन्या या प्रोफेशनल कॅमेरांची निर्मीती करत असतात. कॅमेरा निर्मिताच्या क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या ‘निकॉन’ कंपनीने नुकताच एक नवा कॅमेरा बाजारात लाँच केला आहे. कुलपिक्स पी१००० असं या मॉडेलचं नाव असून या कॅमेराची लेन्स १२५x ऑप्टिकल झुम इतकी अर्थात २४-३०० mm लेन्सच्या बरोबरीची आहे. कुलपिक्स कॅमेराचं मुख्य वैशिष्ट्यं म्हणजे हा ‘जगातील सर्वात मोठी’ ऑप्टिकल झुम लेन्स असलेला कॅमेरा आहे.

Nikon P1000
निकॉन कुलपिक्स पी१००० कॅमेरा

कुलपिक्स पी१००० कॅमेराची भन्नाट वैशिष्ट्यं –

  • १२५x ऑप्टीकल झुम
  • ५.० स्टॉप हायर शटर स्पीड
  • १६ मेगापिक्सल मॅक्झिमम रेझोल्यशुन मॅक्झिमम
  • ४k अल्ट्रा HD व्हिडिओ
  • रॉ फाईल्स सपोर्ट
  • वाईड अँगल ३.२ टीएफटी LCD मॉनेटर

निकॉन कुलपिक्स पी१००० हा कॅमेरा अद्याप भारतात लाँच झाला नसला, तरी लवकच तो भारतीय बाजारात लाँच केला जाईल, अशी चर्चा आहे. सध्या अमेरिकेमध्ये हा कॅमेरा ९९९ डॉलरला उपलब्ध आहे. भारतातल्या फोटोग्राफर्सकडूनही या कॅमेराला पसंती मिळेल अशी खात्री वर्तवली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -