घरटेक-वेकफेसबुक आणि ट्विटरवर आता दिसणार नाहीत खोट्या बातम्या

फेसबुक आणि ट्विटरवर आता दिसणार नाहीत खोट्या बातम्या

Subscribe

दरदिवशी कितीतरी खोट्या बातम्या वा अफवा या सोशल मीडियामध्ये पसरत असतात. पण आता फेसबुक आणि ट्विटरसारख्या सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरण्याला आळा बसणार आहे.

सोशल मीडिया हे सध्याचं सर्वात वेगवान माध्यम आहे. दरदिवशी कितीतरी खोट्या बातम्या वा अफवा या सोशल मीडियामध्ये पसरत असतात. पण आता फेसबुक आणि ट्विटरसारख्या सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरण्याला आळा बसणार आहे. याला आळा बसण्यासाठी वैज्ञानिकांनी एका वेबवर आधारित सॉफ्टवेअर शोधून काढले आहे. अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनच्या वैज्ञानिकांद्वारे हे टूल शोधण्यात आले आहे. या टूलचे नाव नॉव्हेल असणार आहे.

हजारो संकेतस्थळांवरून युआरएल जमवते कंपनी

न्यूजव्हिप ही एक सोशल मीडिया ट्रॅकिंग कंपनी आहे. जी रोज हजारो संकेतस्थळांवरून युआरएल जमवते आणि त्यानंतर फेसबुक, ट्विटरशी संबंधित सर्व सूचना एकत्रित करते. इफ्फी कोशंट टूल हे दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर साधारण ५ हजार सर्वात लोकप्रिय असणार्‍या युआरएलसाठी न्यूजव्हिपकडून माहिती प्राप्त करते. त्यानंतर हे सॉफ्टवेअर स्वतंत्र वेबसाईट मीडिया बायस अथवा सत्यता पडताळली गेली आहे की नाही याची खात्री करून घेते. त्यानंतर स्रोताची सत्यता आणि विश्वनीयता या आधारावर त्याचे वर्गीकरण करण्यात येते.

- Advertisement -

फेसबुकने २०१७ मध्ये अभियान सुरु केले

फेसबुकने सर्वात पहिल्यांदा खोट्या बातम्या आणि खोट्या सूचनांना आळा घालण्याचे काम २०१७ मध्ये सुरु केले. सतत खोट्या बातम्या देणार्‍यांना जाहिराती देणे फेसबुकने बंद केले. टेकक्रंच वेबसाईटने दिलेल्या अहवालानुसार, सोशल मीडियावर ज्या बातमीला विवादित बातमी म्हणून ओळख मिळेल त्या बातमीला फेसबुककडून मिळणार्‍या जाहिराती बंद करण्यात येतील. फेसबुकच्या प्रॉडक्ट डायरेक्टर रॉब लिथर्नने फेसबुक यासाठी तीन प्रकाराने रोख लावण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे खोट्या बातम्यांना आळा बसेल असेही त्यांचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -