घरटेक-वेकअसूसचे वजनाने हलके व्हिवोबुक १४ आणि १५

असूसचे वजनाने हलके व्हिवोबुक १४ आणि १५

Subscribe

दिग्गज टेक कंपनी असूसने आज व्हीवोबुक वर्गात १४ इंची व्हीवोबुक १४(एक्स४१२) आणि १५.६ इंची व्हीवोबुक १५ (एक्स५१२) हे दोन नवीन लॅपटॉप सादर करीत असल्याची घोषणा केली. उच्च परफॉर्मन्स आणि पोर्टेबल मशीन सादर करण्याच्या ब्रँडचा वचनास अनुरूप दोन्ही व्हीवोबुक १४ आणि १५ मध्ये १९.५ एमएम प्रोफाइल आहेत. त्यांचे वजन अनुक्रमे १.५ किलो आणि १.६ किलो आहे. एक अद्वितीय असा अनुभव देणार्‍या व्हीवोबुक १४ आणि १५ या दोन्हींत फ्रेम शिवायचे फोर-साइडेड नॅनोएज डिस्प्ले आहेत, ज्यांच्या आकर्षक व्ह्युइंगसाठी स्क्रीन आणि बॉडीचे गुणोत्तर अनुक्रमे किमान ८७% ते ८८% आहे. अत्यंत पातळ बेझेलमुळे मोठा डिस्प्ले छोट्या चौकटीत बसू शकतो.

हे लॅपटॉप ८व्या जनरेशनच्या इंटेल कोर आय७ प्रोसेसरने समृद्ध, एनव्हीआयडीआयए जीईफोर्स एमएक्स१५० ग्राफिक्स असून अद्भुत परफॉर्मन्स व मल्टी टास्किंगसाठी सक्षम आहेत. नॅनोएज डिस्प्लेमुळे व्हीवोबुकला लहान फूटप्रिंट मिळते व त्यामुळे हा लॅपटॉप स्क्रीन साईझशी तडजोड न करता अधिक पोर्टेबल बनवतो. शिवाय, या दोन्ही डिव्हाईसेसमध्ये असूस ट्रू2लाइफ व्हिडिओ टेक्नॉलॉजी आहे,ही एक अशी प्रगत व्हिडिओ ट्यूनिंग प्रणाली आहे, जी उत्कृष्ट टीव्हीसारखी गुणवत्ता देते व व्हिडिओजमध्ये स्पष्टता, रंग आणि कॉन्ट्रास्ट वाढवते.

- Advertisement -

यात ड्युअल स्टोरेज डिझाइन आहे, ज्यांचे मोजमाप आहे ५१२जीबी एसएसडी आणि १ टीबी एचडीडीपर्यंत. त्याशिवाय ड्युअल बँड वाय-फाय (८०२.११ एसी) कनेक्शन आहे. याची सर्वोच्च गती ८६७ एमबीपीएस पर्यंत आहे, जी ८०२.११एनपेक्षा सहापट जास्त आहे. त्यामुळे व्हिडिओ पाहण्यासाठी व जलद वेब सर्फिंगसाठी अत्यंत अनुकूल आहे. या दोन्ही प्रकारांत ब्लूटुथ ४.२ आहे. व्हीवोबुक १४ फ्लिपकार्टवर ३३,९९० रु किंमतीपासून उपलब्ध असेल तर असूस व्हीवोबुक १५ ऑनलाइन आणि ऑफलाइन उपलब्ध असेल व त्याची किंमत ३४,९९० रु पासून सुरू होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -