घरटेक-वेक'आम्हाला तुमच्या Privacy ची काळजी'; Whatsapp ने शेअर केले स्टेटस

‘आम्हाला तुमच्या Privacy ची काळजी’; Whatsapp ने शेअर केले स्टेटस

Subscribe

नव्या प्रायव्हेट पॉलिसीवर युजर्सकडून नाराजी व्यक्त केल्यानंतर व्हॉट्सअॅपने हे नवं पाऊल

सोशल मीडियातील सर्वात लोकप्रिय असणारं व्हॉट्सअॅप गेल्या काही दिवसांपासून त्याच्या नव्या प्रायव्हेट पॉलिसीमुळे चांगलंच चर्चेत आहे. व्हॉट्सअॅपने आता व्हॉट्सअॅपवर आपले स्टेटस टाकत नव्या प्रायव्हेट पॉलिसी संदर्भात पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिले आहे. हे स्टेटस व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या सर्व युजर्सच्या स्टेटस लिस्टमध्ये दिसत आहे. व्हॉट्सअॅपच्या नव्या प्रायव्हेट पॉलिसीवर युजर्सकडून नाराजी व्यक्त केल्यानंतर व्हॉट्सअॅपने हे नवं पाऊल उचलंलं आहे.

असे दिले स्टेटसमधून स्पष्टीकरण

व्हॉट्सअॅपकडून स्टेटसवर शेअर करण्यात आलेल्या पहिल्या फोटोमध्ये ‘आम्हाला काळजी आहे तुमच्या गोपनीयतेची’, असे म्हटलेले दिसतेय. व्हॉट्सअॅप तुमच्या प्रायव्हसी पॉलिसीबाबत बांधिल आहे. व्हॉट्सअॅप तुमचे चॅट, फोन कॉल्स ऐकू शकत नाही. यासह तुम्ही शेअर केलेले लोकशेनदेखील व्हॉट्सअॅप पाहू शकत नाही. दुसऱ्या फोटोमध्ये ‘जर end to end encrypted वर असलेलं तुमचं खाजगी चॅट व्हॉट्सअॅप वाचू किंवा ऐकू शकत नाही.’, असं सांगितलं आहे.

- Advertisement -


तसेच तिसऱ्या फोटोमध्ये ‘व्हॉट्सअॅप तुम्ही शेअर केलेल लाईव्ह लोकेशन पाहू शकत नाही.’ असेही यामध्ये म्हटले आहे. तर चौथ्या आणि शेवटच्या स्टेटसमध्ये ‘व्हॉट्सअॅप तुमचे कॉन्टॅक्ट्स फेसबुकसोबत शेअर करत नाही.’, असे म्हटले आहे.

अशा आहे व्हॉट्सअॅपच्या अटी

व्हॉट्सअॅपने नवं गोपनीयता धोरण लागू करण्यासाठीची पावलं उचलण्यास सुरुवात केली होती. यासाठी युझर्सना हे धोरण स्वीकारण्यासाठीचे आवाहनही करण्यात आले आहे. तसा मेसेजही अनेकांपर्यंत पोहोचला. व्हॉट्सअॅपचं हे नवं धोरण न स्वीकारणाऱ्यांचं अकाऊंट बंद केले जाणार असेही स्ष्ट करण्यात आले होते. पण आता या धोरणास व्हॉट्सअॅपकडून स्थगिती देण्यात आली असल्यामुळे आता युजर्सना दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -