शाओमीची चिमुरड्यांसाठी ‘क्यूट स्कूटर’

शाओमीच्या पोर्टेबल स्कूटरचे नाव 'शाओमी ७००किड्स' असे आहे. ही स्कूटची उंची मुलाच्या उंचीप्रमाणे बदलता येते.

Mumbai

शाओमी ही कंपनी स्वस्त स्मार्टफोन बनविण्यासाठी लोकप्रिय आहे. या कंपनीने आता लहान मुलांकरिता एक नवीन पोर्टेबल स्कूटर बाजारात आणली आहे. या पोर्टेबल स्कूटर चे नाव ‘शाओमी ७००किड्स’ असे असून याची किंमत २ हजार ५०० रुपये इतकी आहे.

ही स्कूटर पाहिजे तिथे घेऊन जाणं शक्य आहे कारण या स्कूटरची फोल्डिंग डिझाईन आहे. लहान मुलांना ही स्कूटर चालवताना पडण्याची शक्यता कमी आहे. यात वेगळ्या मटेरियलचा वापर केल्यामुळे ही स्कूटर वेगवेगळ्या प्रकारच्या रस्त्यांवर देखील चालू शकते. या शाओमी ७००किड्स स्कूटरचे वजन ५० किलोग्राम आहे.

या स्कूटरच्या पुढील बाजूला दोन व्हिल्स असून त्याचे वाइड ट्रॅक डिझाईन आहे. २४ सेंटीमीटर इतकं पुढील दोन व्हिल्समध्ये अंतर आहे. हे व्हिल्स ५ सेंटीमीटर रुंद असून मजबूत ग्रिप आहे. व्हिल्समध्ये न्यूमॅटिक मॅगनेटचा वापर केला असून त्यात लाइट्स देण्यात आल्या आहेत. महत्त्वाच म्हणजे या लाइट्साठी बॅटरीची आवश्यकता नाही आहे. या स्कूटर मधील ब्रेक मागील बाजूला देण्यात आले आहे. या स्कूटरच्या उंचीत ७५ सेंटीमीटर, ८२ सेंटीमीटर आणि ८९ सेंटीमीटर असे तीन पर्याय दिले आहेत. तसेच या स्कूटरची उंची कमी जास्त करता येते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here