घरट्रेंडिंगअक्षय कुमारचा तो व्हिडिओ खोटा

अक्षय कुमारचा तो व्हिडिओ खोटा

Subscribe

नाना पाटेकर-तनुश्री दत्ता वादानंतर #metoo मोहीमेबद्दल अक्षय कुमारचा प्राकाशित झालेला व्हिडिओ खोटा होता. या प्रकरणी अक्षयने पोलिसांकडे तक्रार केली आहे.

मागील अनेक दिवसांपासून नाना पाटेकर – तनुश्री दत्ता यांच्यात सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपा दरम्यान आता अक्षय कुमारचेही नाव समोर आले आहे. अभिनेता अक्षय कुमार हा #metoo मोहीमेबद्दल बोलत असल्याचा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर प्राकाशीत करण्यात आला होता. महिलांच्या सुरक्षिततेवर अक्षय या व्हिडिओत बोलतो आहे. मात्र या व्हिडिओचा #metoo मोहीमेशी काहीच संबध नसल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी बीकेसी येथील सायबर पोलिसांकडे अक्षयने तक्रार केली असल्याचे त्याच्या प्रवक्त्यानी सांगितले आहे. आपल्या खोट्या व्हिडिओमुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जात असल्यामुळे अखेर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. अजूनही अक्षयने या व्हिडिओबद्दल प्रसार माध्यमांना पूर्णपणे माहिती दिली नसली तरीही तक्रार करण्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे.

“या व्हिडिओमध्ये अक्षय तनुश्री विरोधात बोलताना दिसत आहे. नाना-तनुश्री वादानंतर हा व्हिडिओ प्रकाशित झाल्यामुळे अक्षय या वादावर बोलत असल्याचे भासते. युट्यूबवर त्या व्हिडिओचा शोध घेत आहोत. मात्र, तो व्हिडिओ काढण्यात आला आहे. त्या व्हिडिओची एक कॉपी मागवली आहे. या प्रकरणी चौकशी सुरु आहे.”- सायबर गुन्हे तपास अधिकारी

- Advertisement -

खोटा व्हिडिओ व्हायरल झाल्याने अक्षय नाराज आहे. आपल्या प्रतिष्ठेला या व्हिडिओमुळे धक्का लागला असल्याचे त्याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. २००८ मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान अभिनेता नाना पाटेकर यांनी आपला विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केला होता. मागील काही दिवसांपासून तनुश्री प्रसार माध्यमांसमोर नानावर आरोप केले. यानंतर नाना पाटेकर यांनी तनुश्री दत्ता विरोधात कायदेशीर तक्रार दाखल केली. यानंतर बॉलिवूडमधील काही कलाकारांनी नानाची तर काहींनी तनुश्रीची बाजू प्रसार माध्यमांसमोर बोलतांना मांडली. त्यामुळे बॉलिवूडमध्ये एक दूफळी निर्माण झाली असल्याचे दिसून आले.

बॉलिवूडमध्ये #metoo

नाना-तनुश्रीनंतर बॉलिवूडमधील महिला कलाकारांनी उघडपणे आपल्या बरोबर झालेल्या अन्यायाची तक्रार केली. काल अभिनेत्री कंगना रनौवतने क्वीन चित्रपटाचा दिग्दर्शक विकास बहल याच्या विरोधात वक्तव्य केलं. याचबरोबर गायक कैलास खेर आणि मॉडेल जूल्फी यांच्यावर ही आरोप करण्यात आले. यामुळे आता बॉलिवूडमध्ये #metoo मोहीम सुरु झाली असल्याचे दिसून येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -