घरट्रेंडिंगअयोध्या निकालानंतर जगात टॉप ५ ट्रेंडिंगमध्ये होते 'हे' हॅशटॅग

अयोध्या निकालानंतर जगात टॉप ५ ट्रेंडिंगमध्ये होते ‘हे’ हॅशटॅग

Subscribe

ट्विटरवर जगातील पहिल्या क्रमांकावर #AYODHYAVERDICT ट्रेंड होत आहे. ट्विटरवर टॉप ५ ट्रेडिंग विषयात ४ ट्रेंड आयोध्या प्रकरण संदर्भातील हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये

अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर सोशल नेटवर्किंग साईटवर अयोध्या आणि राम मंदिराशी संबंधित हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे. ट्विटरवर जगातील पहिल्या क्रमांकावर #AYODHYAVERDICT ट्रेंड होत आहे. ट्विटरवर टॉप ५ ट्रेडिंग विषयात ४ ट्रेंड आयोध्या प्रकरण संदर्भातील हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहेत. यामध्ये #AYODHYAVERDICT, #HinduMuslimBhaiBhai, #RamMandir आणि #AyodhyaJudgment यासारखे हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंडमध्ये आहेत.

अयोध्येचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून जाहीर होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी जनतेला शांतता बाळगण्याचे आवाहन केले होते. तसेच या निकालाआधीच देशभरात कडेकोट सुरक्षा व्यवस्थेशिवाय काही ठराविक ठिकाणी इंटरनेट सेवेवर निर्बंध आणण्यात आले होते. असे असताना देखील #AyodhyaVerdict हे हॅशटॅग जगभरात ट्रेंडिंगमध्ये असून ४ लाख ४० हजाराहून अधिक ट्विट केले गेले.

- Advertisement -

हे हॅशटॅग देखील होते टॉप ट्रेंडिंगमध्ये

भारतात #BabriMasjid हे हॅशटॅग नेटकऱ्यांनी वापर करत दिल्लीमध्ये साधारण ५ हजार ट्विटसोबत हा हॅशटॅश ट्रेंड करत होता. तसेच #RanjanGogoi आणि #AyodhyaJudgement हे देखील ट्रेंडिंगमध्ये होते. याशिवाय #JaiShriRam ४० हजाराहून अधिक आणि #RamMandir यासह १ लाख २० हजारांपेक्षा अधिक ट्विट या हॅशटॅगचा वापर करत ट्विट केले गेले. आज दिवसभरात ३३ हजारांहून अधिक ट्विट हे #HinduMuslimBhaiBhai असा हॅशटॅग वापरत केले गेले.

- Advertisement -

  • #AYODHYAVERDICT
  • #RamMandir
  • #AyodhyaJudgement
  • #JaiShriRam
  • #BabriMasjid

तर जगभरात #AyodhyaVerdict या खालोखाल #RamMandir हा हॅशटॅग दुसऱ्या क्रमांकावर होता. या हॅशटॅगचा वापर करत साधारण १ लाखांहून अधिक ट्विट केले गेले. तर तिसऱ्या क्रमांकावर #AyodhyaJudgement होते हा हॅशटॅग ५० हजारांहून अधिकांनी वापरला तर चौथ्या क्रमांकावर #BabriMasjid असून ५० हजार ट्विट केले गेले आणि पाचव्या क्रमांकावर #JaiShriRam हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये होते. या टॅगचा वापर करत ४० हजारांहून अधिक ट्विट केले गेले.


Ayodhya Verdict : जाणून घ्या काय आहे ‘अयोध्या’ प्रकरण
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -